Arrested sakal
मुंबई

अ‍ॅडमिशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या प्राध्यापकास अटक

प्राध्यापकाने विद्यार्थ्याकडून अ‍ॅडमिशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले

सकाळ डिजिटल टीम

'डी फार्मा'मध्ये प्रवेशाच्या नावाखाली दोन डझनहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाला अटक करण्यात आली असून मुंबईच्या कुरार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Professor looted lakhs of rupees from the student showing the lure of admission)

मुंबईच्या आर. के महाविद्यालयात 'डी फार्मा'मध्ये प्रवेशाच्या नावाखाली २४ हून अधिक विद्यार्थ्यांची एका शिक्षकाने फसवणूक केली. परीक्षा उत्तीर्ण आणि प्रवेशाच्या नावाखाली लोकांकडून जवळपास २ लाखांची रक्कम उकळली गेली. संजय दुबे असे या आरोपीचे नाव असून तो आर. के महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे

या प्रकरणाचा सुगावा लागताच मुंबईच्या कुरार पोलिसांनी आरोपी प्राध्यपकाला अटक केली. आरोपी संजयने अनेक विद्यार्थ्याकडून अ‍ॅडमिशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहेत. मुंबईच्या कुरार पोलीसांनी संजयला अटक केल्यानंतर बोरिवली न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाची आणखी कसून चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

IND vs WI: आज रंगणार पहिला वनडे! यशस्वी जैस्वालला रोहितसोबत ओपनिंगला संधी मिळणार? कुठे पाहाणार सामना, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT