राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. (Kirti Somaiya Leaves for Delhi to meet Home Secretary Ajay Bhalla)
मात्र, या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. यासाठी ते तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. (Kirit Somaiya Attacked in Mumbai)
अखेर सोमय्यांची दिल्ली वारी फलदायी ठरल्याची चर्चा आहे.
गृहसचिव अजय भल्लांनी या प्रकरणात दिल्लीतून चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता सीआयएसएफने हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतलंय.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जर पुन्हा हल्ला झाला,तर 'शुट अॅट साईट'चे आदेश देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत CISF च्या मुख्यालयाने गंभीर दखल घेतलीय. पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफच्या कमांडरने चर्चा केल्याची माहिती 'साम'च्या हवाल्याने समोर आली आहे. सोमय्या यांनी कालच दिल्लीत गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली होती. यानंतर सूत्र हालल्याचं म्हटलं जातंय.
किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी सीआयएसएफने देखील खार पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे. किरीट सोमय्या यांचा जबाब नोंदवून झालेला असून, सीआयएसएफने जे पत्र पोलिसांना दिले त्यावर देखील चर्चा झाली आहे.
काय म्हणाले वळसे पाटील?
या प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटत नाही की, CISF ने असा काही आदेश दिला असेल. असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसल्याचं स्पष्टीकरण वळसे पाटलांनी दिलं. या गार्ड्सचं काम संरक्षण करणं आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा सीआयएसएफ असा कोणताही निर्णय देत नसल्याचा खुलासा वळसे पाटील यांनी केला. रीही आपल्याकडे जी माहिती आहे त्याची मी खातरजमा करणार असल्याचं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.