mumbai 
मुंबई

केंद्रीय पथकांच्या सूचना, प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आवश्यक

सकाळवृत्तसेवा

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने  सर्वेक्षण,  वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर द्या, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी येथे केल्या.  

जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक ठाणे जिल्ह्यात आले आहे. या केंद्रीय पथकाने सकाळी कौशल्य हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॉस्पिटल या कोव्हीड रुग्णालयांबरोबरच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला.  
केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे पालिकेच्या बल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीत कोविड १९ ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निनियोजन याबाबत चर्चा झाली.

सर्व विभाग समन्व्याने काम करत असले, तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. फिवर क्लिनिकच्या ठिकाणी योग्य दक्षता घेण्यात यावी. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना जोशी यांनी दिल्या. 

कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांना देखील उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक ते नियोजन करा. प्रत्येक महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अन्न-धान्याचे वितरण व्यवस्थित करा. नागरिकांमधील भिती घालवून विश्वास निर्माण करा, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले. ठाणे पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ठाणे महापालिकेच्या माहितीचे सादरीकरण केले. 
ठाणे जिल्ह्यात आरोग्य, पोलिस, महसुल  प्रशासन हे संयुक्तपणे काम करीत आहे. सर्व महापालिका तसेच हॉस्पिटलमध्ये पुरेश्या प्रमाणात सर्व सुविधा आहेत, असे कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितले. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.  नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण-डोंबिवली आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, मिरा-भाईंदर आयुक्त चंद्रकांत डांगे यांनीही केलेल्या उपाययोजना व जनजागृतीबाबत माहिती दिली. 

कम्युनिटी किचनद्वारे जेवणाची व्यवस्था   
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कम्युनिटी किचनची व अडकून पडलेल्या मजूर व कामगारांची निवास व जेवणाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.  जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मनपांचे वैद्यकीय आधिकारी, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Strict enforcement is required in restricted areas Information from Central Squad,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT