Nanded Fire Accident News esakal
नांदेड

धक्कादायक ! ट्रकला लागली अचानक आग, तरुण ट्रकचालक जळून खाक

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला अचानक आग लागली.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात कॅबिनमधील तरुण ट्रकचालक जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.२७) पहाटे एकच्या सुमारास घडली आहे. ही घटना नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली, की कंधार तालुक्यातील हाळदा येथील ट्रकचालक नितीन सटवाजी कांबळे व रमेश लालू वाघमारे शनिवारी (ता.२६) गोदिंया येथून ट्रकमध्ये ( एमएच ४० बीजी ९६०४) तांदूळ घेऊन नांदेडमार्गे (Nanded) लातूरकडे (Latur) जात होते. रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास नवीन नांदेड येथील बिजली हनुमान मंदिराजवळ ट्रक थांबवली. (Suddenly Set Fire Truck In Nanded, Truck Driver Burned)

रमेश वाघमारे घरी जेवणासाठी निघून गेले. ट्रकचालक नितीन कांबळे ट्रकमध्ये झोपले होते. वाघमारे पहाटे एकच्या सुमारास ट्रककडे आले. त्यांना ट्रक पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसले. मात्र ते येण्यापूर्वीच अग्निशामक दलाने ट्रकला लागलेली आग नियंत्रणात आणली होती. रमेश वाघमारे यांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये पाहिले असता नितीन कांबळे जळून खाक झालेला दिसला.

आगीचे कारण स्पष होऊ शकलेले नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार शेख जावेद करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT