पश्चिम महाराष्ट्र

अभिमानास्पद : देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांत 'कृष्णा'ची निवड; कोरोनावरील लस सामन्यांना उपलब्ध हाेणार

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कोरोनावर पुण्यातील प्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. त्या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. त्या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड झाली आहे. त्यात येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोरोना लस संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी कृष्णा हॉस्पिटलची निवड झाल्याने कऱ्हाडचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.
 
डॉ. भोसले म्हणाले, ""धनुर्वात, गोवर, डेंगीसारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूट ही अमेरिकन बायोटेक्‍नॉलॉजी कंपनी आहे. कोडाजेनिक्‍सच्या मदतीने फेब्रुवारी महिन्यातच कोरोनावर मात करणारी लस विकसित करण्यास प्रारंभ केला. लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी "ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ची मान्यता आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध सीआरओएम क्‍लिनिकल रिसर्च ऍण्ड मेडिकल टुरिझम या एनएबीएच मान्यता प्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे. अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्‍चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव आदी निकषांच्या कृष्णा हॉस्पिटलची संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड झाली आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ संशोधक डॉक्‍टर्स या संशोधन कार्यात योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
 
चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात समाजातील उच्च जोखीम गटात मोडणाऱ्या म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलिस, सुरक्षा गार्ड, भाजीपाल व फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा अभ्यास केला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव प्रकल्पाच्या समन्वयक आहेत. सीआरओएमचे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील सीरम इन्स्टिट्यूटतर्फे प्रकल्पाचे निरीक्षक असतील. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी या लसीचा मोठा उपयोग होणार आहे. वैद्यकीय चाचण्यांच्या यशस्वितेनंतर लस सामान्य लोकांसाठीही उपलब्ध करून देण्याचा सीरम इन्स्टिट्यूटचा मनोदय आहे. 

Video : इमर्जन्सी पेशंट...धावाधाव...त्यात डाॅक्टरांची अट...घाबरगुंडी...पुढे काय घडले वाचा


अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्‍चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधन आणि हॉस्पिटलचा दीर्घ अनुभव आदी निकषांवर कृष्णा हॉस्पिटलची संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड झाली आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ संशोधक डॉक्‍टर्स संशोधन कार्यात योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
- डॉ. सुरेश भोसले, अध्यक्ष, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT