Pune-Ganpati Visarjan 
पुणे

पुणे उपनगरांमध्ये भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता; कोठे कसे झाले विसर्जन वाचा सविस्तर

शीतल बर्गे, विठ्ठल तांबे, रूपाली अवचरे, समाधान काटे, हरीश शर्मा

पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची मुक्तहस्ते उधळण, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई... विसर्जन मिरवणुकीतील दरवर्षी दिसणारे हे चित्र यंदा मात्र उपनगरांत कोठेच पाहायला मिळाले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुचविलेल्या सर्व नियमांचे गणेशभक्तांनी तंतोतंत पालन केल्याचे आढळून आले. ‘कोरोनाचे निर्दालन करीत पुढील वर्षी दिमाखात या’ असे साकडे घालत भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर- बालेवाडीत भक्तिमय वातावरण
बालेवाडी - ‘गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या..’च्या गजरात बाणेर, बालेवाडी परिसरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भागातील गणेश मंडळांनी मंडपातच गणपती मूर्तीचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले, तर घरगुती गणपतीचे बादलीमध्ये विसर्जन करण्यात आले, तर काहींनी मात्र महापालिकेच्या विसर्जन हौदाला प्राधान्य दिले.

दरवर्षी बाणेर- बालेवाडी परिसरातील गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो, पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास सहकार्य करण्यासाठी सामाजिक भान राखत यंदा अनेक मंडळांनी छोट्या शाडूच्या मूर्तीची मंदिराच्या आवारात किंवा छोट्या मंडपामध्ये प्रतिष्ठापना केली होती आणि विसर्जनही मंडपातच केले. 

या भागातील नगरसेवकांकडून फिरत्या विसर्जन हौदांची सोय आपापल्या  प्रभागांमध्ये करण्यात आली होती. 

यावर्षी आम्ही गणपती विसर्जनासाठी घाटावर न जाता, फिरत्या विसर्जन हौदात गणपती विसर्जन करण्याचा पर्याय निवडला. मूर्तीदान हा पर्यायही आम्हाला देण्यात आला होता, पण पारंपरिकरीत्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी हौदात  गणपतीचे विसर्जन केले.
- अनिकेत मुरकुटे, बाणेर

दरवर्षी आमच्या सोसायटीत दहा दिवस गणपती असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असते, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गणपती दहा दिवस न ठेवता दीड दिवसांच्या गणपती सोहळ्याचे आयोजन केले होते.
- ज्योती वाबळे, ओमेगा रेसिडेन्सी

कॅम्प भागात संकलन केंद्रास प्राधान्य
पुणे - कॅम्प भागातील मंडळांच्या तसेच घरगुती गणपती विसर्जनासाठी सर्व वॉर्डांत कॅंटोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून विसर्जन हौद उभारण्यात आले होते. या हौदांमध्ये गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले, तर काही भाविकांनी संकलन केंद्रांत मूर्ती देण्यास प्राधान्य दिले.

केदारी रस्त्यावरील हिंद तरुण मंडळामध्ये नगरसेवक दिलीप गिरमकर यांनी मंडळ व स्वरूपवर्धिनी संस्था यांच्या मार्फत प्रदूषण व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रथमच निर्माल्य व गणपती मूर्ती संकलन, असा उपक्रम राबविला. या उपक्रमाद्वारे कॅम्प भागातील १३५ गणेशमूर्ती मंडळाकडे सुपूर्त करण्यात आल्या, तसेच २६० पेक्षा जास्त गणेशमूर्ती  हौदामध्ये विसर्जित करण्यात आल्या.

पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने राणी लक्ष्मीबाई उद्यानात उभारलेल्या कृत्रिम विसर्जन हौदामध्ये लष्कर भागातील मानाचा पहिला कामाठीपुरा गणेशोत्सव मंडळ, श्रीपाद तरुण मंडळ, नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान, शिवराम तरुण मंडळ आदी मंडळाच्या गणपती सोबतच सुमारे ४५० पेक्षा अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

मानाजीबाग मंडळातर्फे निर्माल्य संकलन
रेंजहिल्स - कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खडकी येथील मानाजी बाग सार्वजनिक मंडळाने गणेश मंदिरासमोर भव्य विसर्जन हौद तयार करून लोकांची गैरसोय दूर केली. 

मानाजीबाग, भोईटेनगर, आदिनाथ तरुण मंडळ, इंदिरा तरुण मंडळ, तसेच सांगवी, रेंजहिल्स, बोपोडी या भागातील भाविकांनी या विसर्जन हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सकाळी नऊपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ६० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले

या उपक्रमासाठी संकेत शिंदे, राम चिंतलवार, प्रमोद शेळके, सूरज परदेशी, रोहित मोरे, अक्षय सोनवणे, उमेश वाघमारे, ऋत्विक नायडू, अक्षय मोरे आदींचे विशेष सहकार्य लाभले. निर्माल्य नदीत टाकू नये यासाठी कार्यकर्ते ओमकार शितकर, विशाल माने, अक्षय मोरे, आकाश चव्हाण, प्रथमेश शिंदे, आकाश मुळे, वैभव टोणपे, वैभव माने यांनी घरोघरी जाऊन निर्माल्य संकलन केले. मंडळाचे अध्यक्ष गोविंद निंबाळकर, दत्तात्रेय लगड, मंगेश दिवेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

गोखलेनगर परिसरात नियमांचे पालन
गोखलेनगर - प्रभाग क्रमांक सातमध्ये सतीश बहिरट व शुभम बहिरट मित्र परिवाराच्या वतीने फिरत्या गणपती विसर्जन हौदांचे आयोजन करण्यात आले होते. गोखलेनगर, सेनापती बापट रस्ता, शिवाजी हौसिंग सोसायटी या परिसरातील नागरिकांनी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन या फिरत्या हौंदामध्ये केले.

शासनाच्या नियम व अटींचे पालन करून फिरता हौद नागरिकांच्या घरोघरी नेण्यात आले होते. जवळपास पाचशेपेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला.

खडकीमध्ये शांततेत विसर्जन
खडकी बाजार - खडकी, बोपोडी, मुळा रस्ता, पाटील इस्टेट, संगमवाडी, साप्रस आदी भागात कृत्रिम हौदात सार्वजनिक मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले. खडकी बाजारातील मानाचे पहिले नूतन तरुण मंडळ, मानाचा दुसरा मधला बाजार मित्र मंडळाच्या गणपती मूर्तींचेही  कृत्रिम हौदातच विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात  खडकी - बोपोडीकरांनी आनंदात गणरायाला निरोप दिला. मात्र दरवर्षी प्रमाणे कुठेही गर्दी, ढोल-ताशा नसल्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर नाराजीचे सावट पसरले होते.                                          

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने गणेश विसर्जनासाठी पाच ठिकाणी विसर्जन हौद बसविण्यात आले होते. खडकी बाजारातील मोरया प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत  प्रतिष्ठानचे  सर्व सदस्य सकाळी नऊ वाजल्यापासून  रात्री दहा वाजेपर्यंत  गणेश विसर्जनासाठी विसर्जन ठिकाणी सेवा देत होते. खडकी बोर्डाच्या आरोग्य अधीक्षकांनी सर्व ठिकाणी उत्तम व्यवस्था तैनात केली होती. बोपोडीतही सर्व ठिकाणी हौदातच गणेश विसर्जन करण्यात आले. यंदा नाही तर पुढच्या वर्षी अधिक जोमाने आनंदात गणेशोत्सव साजरा करू, अशी प्रतिक्रिया खडकी - बोपोडीतील गणेशभक्तांनी व्यक्त केल्या.

वडगाव भागात फिरत्या हौदाकडे पाठ
धायरी - वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया...’, ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदामध्ये केले. परंतु, काही नागरिकांनी फिरत्या हौदांकडे पाठ फिरवत थेट कॅनॉलमध्ये गणेश विसर्जन केले. 

वडगाव फाटा येथील कॅनॉलजवळ महानगरपालिकेचे कर्मचारी फिरकले नाही, तसेच येथे पोलिस बंदोबस्तदेखील नव्हता. त्यामुळे अनेकांनी या संधीचा फायदा घेत गणपती विसर्जन कॅनॉलमध्येच केले. यावेळी जीव धोक्‍यात घालून नागरिक व लहान मुले कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात उतरून गणपती विसर्जन करत होते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT