District administration ready for the victory Pillar Greeting program in Koregaon Bhima 
पुणे

कोरेगाव भीमा : विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी अशी असेल मोफत बससेवा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी केले. नियोजित वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतूक बसेस करणार आहेत.


कोरेगाव भीमा : विजयस्तंभ अभिवादन दिनी बंदोबस्तासाठी दहा हजारांचा फौजफाटा

कोरेगाव भिमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांनतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते. 

पुण्यातील तळेगाव खिंडीचा इतिहास उजेडात? पहा काय सापडले?​


वाहतूकीची सोय
अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी 31 डिसेंबर 2019 व 1 जानेवारी 2020 ला एकूण 260 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतूक या बसेस करणार आहेत.

गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

1 जानेवारीला 'ड्रायडे
1 जानेवारीला 'ड्रायडे' घोषित करण्यात आला आहे. लोणीकंद आणि शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा, भिमा कोरेगांव, शिक्रापूर, सणसवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्री बंदी बाबत आदेश देण्यात आले आहेत.

"तुमची लेणी बघायला कुत्रंही येत नाही' असे  म्हणणाऱ्या आढळरावांच्या सोशल मीडियावर निषेध ​

वाघोलीतील आठवडे बाजार बंद
वाघोली येथील 31 डिसेंबर रोजी होणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. 740 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली. 

पंतप्रधान आवस योजनेतून घर घेतायं मग, ही बातमी वाचा कारण..

जिल्हाधिकारी राम म्हणाले," विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. कार्यक्रमास मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. मागील वर्षीच्या नियोजनामध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करुन नागरिकांना आवश्‍यक त्या सुविधा देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विजयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभाग योग्य त्या उपाययोजना करत असून यासाठी प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.  

लावणी महोत्सवावरून रुपाली ठोंबरे यांचे मोहिते समर्थकांना ठोस प्रत्युत्तर

पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले," नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाचे प्राधान्य असून सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी अतिरिक्त पोलीस यंत्रणा कार्यरत राहणार आहे. 400 पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे 10 हजार पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, होमगार्ड व स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. 'ट्रॅफिक जॅम' ची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक वळविण्यात येणार आहे.' 

Video : धरणात पाणी असूनही गुरुवारी पुरवठा बंद का? : चंद्रकांत पाटील

- विजयस्तंभ परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी 24 लाख रुपयांच्या निधीतून चार हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. 
- 48 लाख रुपयांच्या निधीतून जयस्तंभ परिसरात कायमस्वरुपी पथदिवे बसविण्यात येत आहेत. 
- मुख्य रस्ता आणि वाहनतळ येथे तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात येत आहे. 
- 100 टॅंकरव्दारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
- 500 फिरते स्वच्छतागृह असणार आहेत. 
- 12 ओपीडी सेंटर्स, 20 रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा नागरिकांसाठी तयार ठेवण्यात येत आहे. 
- 15 ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT