dog-lover 
पुणे

उपाशी भटक्या कुत्र्यांवर डॉग फिडरची भूतदया...

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी ( पुणे ) - जनता कर्फ्यु ते आजपर्यंतच्या लॉकडाऊनच्या काळात माणसाबरोबर सर्वात जास्त उपासमार कोणाची झाली असेल तर ती भटक्या कुत्र्यांची... ऐरवी हॉटेल, खाणावळी ते स्नँक्स सेंटरच्या उष्ट्या व खरकट्या अन्नपदार्थावर यथेच्छ ताव मारून गब्बर झालेली कुत्री आठ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये उपाशी राहून पुर्णपणे निस्तेज झालेली दिसत आहे. परंतु चोच देणाऱ्याने चारापाण्याची ही व्यवस्था केलेली असते... या म्हणीप्रमाणे पुणे व पिंपरी चिंचवड शहराती डॉग फिडर आता या कुत्र्यांच्या दाणापाण्यासाठी मैदानत उतरले आहेत.

व्हॉट्स अप आणि फेसबुकच्या सहायाने पाचशे पेक्षा अधिक डॉग फिडर एकत्र येऊन पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कुत्र्यांना दररोज अन्नपाणी आपापल्या परीने देत आहेत. त्यामुळे भलेही सुस्ती सुटेल ऐवढे खायला नाही मिळाले तरी अंगात प्राण शिल्लक राहिल ऐवढे अन्न या डॉग फिडर कडून कुत्र्यांना मिळत आहे.

सांगवीतून कुणाल कुऱ्हाडे, नेहरूनगर मधून राजेंद्र सिंग, खडकीतून अस्मिता वेतूरकर, वारजे माळवाडीतून वंदना ठक्कर, रजनी दारावजो यासारखे असंख्य श्वानप्रेमी या भटक्या कुत्र्यांची पुर्वीपासून काळजी घेत आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळात जास्तीची उपासमार या भटक्या कुत्र्यांच्या आयुष्याच मोठी आपत्तीच ठरत असताना पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील पाचशे पेक्षा अधिक श्वानप्रेमी आपापलल्या भागात पन्नास ते शंभर कुत्र्यांना दररोज खाऊ घालत आहेत.

सांगवीतील कुणाल कुऱ्हाडे म्हणाले, " आंम्ही कोणाकडेही पैशाच्या स्वरूपात वर्गणी वा इतर मदत मागत नाही. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून या भटक्या कुत्र्यांना भात, चपाती, दुध वा चिकनचे कटपीस खाऊ घालतो. आंम्ही सर्व मिळुन दोन्ही शहरातील सात ते आठ हजार कुत्र्यांना आंम्ही खाऊ घालतो. "

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT