Due to lack of public transport rickshaws are the mainstay of Pune residents 
पुणे

...म्हणुन रिक्षा ठरतेय पुणेकरांसाठी आधार

सकाळवृत्तसेवा

पुणे : विमान, रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू न झाल्यामुळे कष्टकरी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, अपंग आणि ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत, अशा नागरिकांना सध्या रिक्षांवर अवलंबून राहवे लागत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर केंद्र आणि राज्य सरकारने निर्बंध घातले होते. परंतु, आता विमान, रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. तसेच पुण्यात कॅबलाही परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील दुकानेही उघड़ली असून जनजीवन सुरळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांचीही रस्त्यांवर वर्दळ सुरू झाली आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वैद्यकीय इमर्जन्सीसाठी पोलिसांनी रिक्षा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लॉकडाउनच्या पहिल्या व दुसऱया टप्प्यात त्यातून सुमारे 17 नागरिकांनी प्रवास केला. परंतु, जनजीवन सुरळीत होत असताना, अजूनही पीएमपीची बस सेवा बंद आहे. ही सेवा सुरू करण्याची महापालिका आयुक्तांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कामावर जाणाऱया आणि स्वतःचे वाहन नसलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात प्रामुख्याने कष्टकरी वर्गाचा समावेश आहे. बस नसल्यामुळे त्यांना शेअर रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. 

- 70 हजार रिक्षाचालकांचा प्रश्न 

''शहरात रिक्षा वाहतुकीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र रिक्षा वाहतूक सुरू झाली आहे. ही नागरिकांच्या गरजेची बाब असल्यामुळे पोलिसही त्याकडे माणुकीसच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष करीत आहेत. तसेच शहरात रिक्षांचीही संख्या 70 हजार आहे. त्यावर सुमारे अडीच लाख नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांनाही रिक्षा फार काळ बंद ठेवणे शक्य झालेले नाही.''

विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षेचे वास्तव तुम्हाला माहिती आहे का?

- रिक्षाचालकांच्या अभिनव क्लुप्त्या 

''वाहतूक सुरू करतानाही अनेक रिक्षाचालकांनी अभिनव क्लुप्त्या लढविल्या आहेत. चालक आणि प्रवाशांच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर करणे, प्रवाशांना सॅनिटायझर देणे, रिक्षाचालकाने मास्क शिल्डचा वापर करणे, मास्क नसलेल्या प्रवाशांना प्रवेश न देणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.''  

"टीडीआर'चे बंधन 33 टक्‍के ?; झोपडपट्ट्यांचा विकास आता अधिक गतीने 

- रिक्षापंचायत म्हणते.... 

रिक्षा पंचायतीचे समन्वयक नितीन पवार म्हणाले, ''महापालिका आयुक्तांनी 8 जून रोजी काढलेल्या आदेशात रिक्षाला परवानगी देण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यानुसार ही वाहतूक सुरू झालेली आहे. ही वाहतूक बेकायदा नाही. नागरिक आणि रिक्षाचालक हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. रिक्षा ही समाजाची गरज आहे, हे मान्य केले पाहिजे.'' 

 पुण्यात कोणता खासदार अव्वल? वाचा सविस्तर बातमी

- पोलिस म्हणतात...

'या बाबत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पोलिस अधिकारी म्हणाले की, ''नागरिकांची गरज आहे. तसेच या बाबत महापालिका आयुक्तांनी काही प्रमाणात शिथिलता दिलेली आहे. त्यानुसार वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रिक्षाचालकांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही.''

 अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द

- प्रवासी म्हणतात..

''बालाजीनगरमध्ये मी राहतो. मला टिळक रोडला कामाला जावे लागते. सध्या बस नसल्यामुळे काही दिवस सायकल वापरली. परंतु, घरी जाताना संपूर्ण चढ आहे.त्यामुळे अवघड होते. काही दिवसांपासून शेअर रिक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे 10 रुपयांत स्वारगेटला पोचणे शक्य होते.''
- राजेंद्र जाधव

आरटीई प्रवेशासंदर्भात मोठी बातमी; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT