licence 
पुणे

वाहनचालकांना मोठा दिलास:लायसनची मुदत संपली तरी,आता 5 महिन्यांची मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्यामुळे केंद्र सरकारने वाहनचालकांना दिलासा दिला आहे. लायसन तसेच ज्या वाहनांचे परमिट, फिटनेस सर्टिफिकीट आदींची मुदत 1 फेब्रुवारीनंतर संपली असेल, तरी कागदपत्रे 30 जूनपर्यंत चालणार असल्याचे केंद्राने आदेशात म्हटले आहे. आता राज्य सरकारने या बाबतच्या सूचना राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिल्यावर केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

कोरोनामुळे सर्वच शासकीय विभागांचे कामकाज सध्या बंद आहे. तसेच रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने 30 मार्च रोजी आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की, वाहनचालकांच्या लायसनची मुदत 1 फेब्रुवारीनंतर संपली असेल तरी त्याला पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार ते लायसन 30 जूनपर्यंत वैध असेल. तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनांचे परमिट, फिटनेस सर्टिफिकीट, नोंदणी पुस्तिका आदी संबंधित परवान्यांनाही 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या बाबतचा आदेश काढला असला तरी, राज्य सरकारच्या परिवहन विभागाने या बाबतच्या नेमक्‍या सूचना राज्यातील "आरटीओ' देणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे. या बाबत ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, ""केंद्र सरकारच्या निर्णयासाठी आमची संघटना प्रयत्नशील होती. त्याला यश आले आहे. आता या कालावधीतील कर, विम्याची रक्कम या बाबत मुदतवाढ मिळावी म्हणून संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार त्याबाबत सकारात्मक पावले उचलेल, अशी अपेक्षा आहे.''

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

SCROLL FOR NEXT