Hotel and Mess are not providing Onion due to Hike in Price 
पुणे

हॉटेल, वडापावच्या गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : कांदा भाव वाढीमुळे शहरातील अनेक हॉटेल, वडापावच्या गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब झाला आहे. अनेक नॉनव्हेज हॉटेलात ग्राहकांनी कांदा प्लेट ला वेगळे पैसे देण्याची तयारी ठेवली तरी ग्राहकांना हॉटेल चालक कांदा देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कांद्याची जागा आता काकडी आणि कोबी ने घेतली आहे. 

वो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा  

सध्या बाजारात कांद्याचां भाव प्रती किलो १५० रुपयांपेक्षा वर गेला आहे. त्यामुळे सर्वसामन्य नागरिक, महिला वर्ग चिंतेत आहे. तसेच भाजी-पोळी केंद्र, खानावळी, हॉटेल्स येथे कांदा आणणे पूर्णपणे कमी झाले आहे. ५० ते ८० रूपयांत खानावळीत राईस प्लेट दिली जाते. याआधी या शाकाहारी थाळीसोबत कांद्याच्या एक-दोन फोड ग्राहकांना दिल्या जात होत्या. परंतु नॉनव्हेज थाळीसोबतच कांदा दिला जात नाही. आम्ही कांदा खूपच कमी प्रमाणात आणतो. तसेच कांदा भाज्यांमध्येही खूपच कमी टाकत आहोत त्यामुळे तोंडी लावण्यासाठी तुम्हाला कुठून देणार, असे उत्तर ग्राहकांना खानावळीतून दिले जात आहे.

पुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव  

यंदा अतिपावसामुळे कांद्याचे पिक वाया गेले. नविन कांद्याला पावसाचा फटका बसल्याने उत्पन्न घटले असून दर्जाही खालावला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटून दरात तेजी आली आहे. त्यामुळे एरव्ही १० ते ३० रूपये किलो मिळणाऱ्या कांद्याचे भाव सध्या किरकोळ बाजारात १६० रूपयांवर पोहचले आहेत. कांदा भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने कांदा आयातीला परवानगी दिली असली तरी मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात आयात होत असल्याने कांद्याच्या भावातील तेजी टिकून आहे.

थाळीमध्ये दिल्या जाणाऱ्या कोशिंबीरीमध्येही कांदा टाकला जात नाही. गाजर, काकडी यांची कोशिंबीर दिली जाते. वडा-भजी विकल्या जाणाऱ्या दुकानांमधूनही कांद्याची जागा आता कोबी व मुळ्याने घेतली आहे. कांदा भजीचे भाव वाढवले गेले आहेत. ‘आमचे नॉनव्हेज हॉटेल असल्याने कांद्याची मागणी ग्राहक करतात. भाड्याच्या जागेत काही हॉटेल चालवली जातात. गॅस सिलेंडरचे भाव, कामगारांचा पगार असे सर्वच भाव वाढल्याने असा निर्णय घ्यावा लागतो. त्यात कामगारही कमी पगारात काम करत नाहीत.

पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

''मिसळबरोबर कांदा खाण्याचे प्रमाण जास्त आहे.  मागील काही महिन्यांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव ग्राहकांना मिसळबरोबर कांदा द्यावा लागत आहे. मिसळच्या भावात वाढ करून ग्राहकांना परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आमची कुचंबना होत आहे. कांद्याचे भाव लवकर कमी न झाल्यास व्यावसायावर मोठा परिणाम होईल.''
- मंगेश काळे, साई छाया मिसळ.

#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

''कांदा महागल्याने खाद्यपदार्थांबरोबर कांदा देणे बंद केले आहे. परिणामी ग्राहकांवर परिणाम झाला आहे. कांदा भजीची प्लेट सुमारे २० रूपयांना मिळत असे. कांदा महागल्याने कांदा भजीच्या प्लेटमध्ये १० रूपयांनी वाढ केली आहे. तर अनेकांनी कांदा भजी बनविने बंद केली असून कोबी भजी सुरू केली आहे.''
- राजेंद्र चोरघे, जय शारदा गजानन स्नॅक्स. 

गणित विषय अवघड तरी अनिवार्यच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT