Students_Admission
Students_Admission 
पुणे

अकरावी अ‍ॅडमिशन : टॉपच्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी लागणार 'इतके' टक्के; आकडे सांगतात...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्हाला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्के असल्यास शहरातील नामांकित महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. परंतु त्यातही चुरस रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश अर्जात कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक क्रम निवडणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दहावीच्या निकालामध्ये वाढ झाल्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा कट ऑफ वाढणार आहे. केवळ मागील वर्षाच्या प्रवेशाचा कट ऑफ पाहून कनिष्ठ महाविद्यालयांची निवड केल्यास विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडताना काळजी घ्यावी लागणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात 304 कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण एक लाख सहा हजार 972 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी 77 हजार 111 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यातील 22 हजार 370 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक करण्यात आले आहेत. प्रवेश अर्जातील भाग एक भरण्यास शनिवारपासून सुरवात झाली अहो. यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिका अपलोड करून प्रवेशाचा अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवेश अर्जातील भाग दोन भरण्यासंदर्भात सविस्तर वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची सुविधा दिली जाणार आहे. हे पसंतीक्रम निवडताना साधारणपणे मागील वर्षी संबंधित महाविद्यालयातील कट ऑफ तपासले जातात. त्यावरून विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याचा अंदाज बांधला जातो. परंतु यंदा निकालाचा आणि 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या राज्य मंडळासह सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याने यंदाच्या वर्षी कट ऑफ दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांकडून व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जात पसंतीक्रम भरताना मार्गदर्शन व्हावे, म्हणून अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने गेल्यावर्षीच्या कट ऑफची यादी रविवारी दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम काळजीपूर्वक भरावे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

शहरातील नामवंत महाविद्यालयातील गेल्या वर्षीचा 'कट ऑफ':

महाविद्यालयांचा कट ऑफ शाखानिहाय :
विज्ञान शाखा :-
- महाविद्यालयाचे नाव : कट ऑफ (टक्केवारीत)
- फर्ग्युसन महाविद्यालय : 96 टक्के
- आपटे प्रशाला : 95.6 टक्के
- स. प. महाविद्यालय : 91.2 टक्के
- मॉडर्न कॉलेज : 90.6 टक्के
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : 89.6 टक्के
- एमएमसीसी : 89.2 टक्के
- नूमवि हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : 87.6 टक्के
- विमलाबाई गरवारे : 87 टक्के
- विद्या भवन कनिष्ठ महाविद्यालय : 85.4 टक्के
- मुक्तांगण कनिष्ठ महाविद्यालय : 82.6 टक्के

वाणिज्य शाखा :-
महाविद्यालयाचे नाव : कट ऑफ टक्केवारीत
- बीएमसीसी : 94.8 टक्के
- एमईएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : 91.2 टक्के
- सिंबायोसिस महाविद्यालय : 90 टक्के
- स.प. महाविद्यालय : 88.6 टक्के
- मॉडर्न कॉलेज : 86 टक्के
- विमलाबाई गरवारे महाविद्यालय : 85.2 टक्के
- एमएमसीसी : 85.2 टक्के
- नेस वाडिया महाविद्यालय : 82.8 टक्के

कला शाखा :-
महाविद्यालयाचे नाव : कट ऑफ टक्केवारीत
- फर्ग्युसन महाविद्यालय (कला -इंग्रजी) : 95.6 टक्के
- फर्ग्युसन महाविद्यालय (कला-मराठी) : 81.2 टक्के
- सिंबायोसिस महाविद्यालय (कला - इंग्रजी) : 93.8 टक्के 
- स.प. महाविद्यालय (कला-इंग्रजी) : 94 टक्के 
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : 53.4 टक्के

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT