पुणे

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० लाखाची मदत 

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'कोरोना' विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर शर्थीचे प्रयत्न चालू आहे. यासाठी शासनाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'कोरोना'मुळे अकास्मिक उद्भवलेल्या आपत्तीला सामोरे जाताना विविध स्तरावर उपाय योजना व उपक्रम राबविले जात आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपुर्ण निर्णय शासन घेत आहे. एकीकडे देशात व राज्यात संपूर्णपणे लॉक डाऊन असताना मोठी आर्थिक हानी होत आहे. त्याचा बोजा महाराष्ट्र शासनावर येत आहे. त्यामुळे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे व संस्थेच्या पदाधिकारी यांनी सर्वानुमते संस्थेतील ४ हजारहून जास्त कार्यरत असलेल्या प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन व संस्थेच्या संबंधीचे व्यवसायिक याच्याकडून ठराविक रक्कम अशी एकूण ५० लाख रूपयांची "मुख्यमंत्री सहायता निधी" येथे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.  भविष्यात शाळा महाविद्यालय पूर्ववत सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना देखिल आर्थिक मदत देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. 

"परिस्थतीचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण, स्वयंसेवी व उद्योग क्षेत्रातील संस्थांनी या कठीण प्रसंगात महाराष्ट्र शासनास सर्वोतोपरी मदत करावी व खंबीरपणे शासनाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन एकबोटे यांनी केले आहे.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT