पणदरे येथे 300 जणांनी केले रक्तदान
पणदरे येथे 300 जणांनी केले रक्तदान 
पुणे

रुग्णांच्या मदतीसाठी 300 युवकांनी केले रक्तदान 

सकाळवृत्तसेवा

बारामती : बॅनरबाजी व इतर वायफळ खर्चाला फाटा देऊन बारामती तालुक्यात सध्या चालू असणाऱ्या साथीच्या आजारांमुळे बारामती ब्लड बँकेला असणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन पणदरे पंचक्रोशीतील तरुणांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून रक्ताच्या 300 बाटल्यांचे संकलन केले.

पणदरे गावामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या स्वराज्य सोशल फाऊंडेशनने सालाबादप्रमाणे याही वर्षी शरद पवार व स्वराज्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते स्वप्नीलअण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तालुक्यातील रुग्णांना असलेली रक्ताची गरज लक्षात या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन परिसरातील तरुणांनी सुमारे 300 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन गावातील महिलां प्रतिनिधींच्या हस्ते करून एक नवीन चांगला पायंडा घालण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समिती सभापती संजय भोसले, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप पाटील जगताप, बारामती नगरपरिषदेचे गतनेते सचिन सातव, स्वराज्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नीलअण्णा जगताप, मोनिका जगताप, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व पणदरे गावातील सर्वच आजी - माजी ज्येष्ठ पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. पणदरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून या विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT