police esakal
पुणे

Pune News : धक्कादायक! पुण्यातील बालसुधारगृहातून कोयता गँग फरार

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune News : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. (Eight Accused Of Koyta Gang Run From Balsudhargruh Pune)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या गँगमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली असतानाच कोयता गँगचे आठ सदस्य पुण्यातील येरवडा येथील बालसुधारगृहातून पळून गेले आहेत.

पळून गेलेले हे सर्व कोयता गँगचे सदस्य असून, येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात होते.

पुण्यातील कोयता गँग मधील काही आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांना येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृहामध्ये या ठिकाणी ठेवले होते.

यातील ८ अल्पवयीन मुलांनी भरदिवसा संस्थेच्या सरंक्षण भितीला शिडी लावून खिडकी तोडून पलायन केले.

सौरभ शिवाजी वायदंडे जो कोयता घेऊन दहशत मजवणे यासारख्या अनेक गंभीर गुन्हांमध्ये सहभागी असलेला आरोपी याने देखील पलायन केले आहे.

पुण्यातील येरवडा येथे असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये विविध गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना आणले जाते आणि तिथे त्यांना समुपोडेशन केले जाते.

या मुलांना विविध सत्रांसाठी बाहेर आणले जाते. त्यावेळी या ८ मुलांनी आवारातील एका खिडकीला शिडी लावली आणि खिडकी तोडून तेथून पळ काढला. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं स्थापन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Internal Conflict : सुनेत्रा पवारांसमोर तटकरे-भुजबळांमध्ये वादावादी; पार्थ पवार तडकाफडकी निघून गेले, देवगिरी बंगल्यावरील वातावरण तापलं

Nashik: ३६ वर्षीय विवाहितेनं २६ वर्षीय प्रियकराचा केला खून, जिच्यासाठी घर सोडलं तिनेच संपवलं; तिघींवर गुन्हा दाखल

Nagpur: नवीन नागपूर, तिसऱ्या रिंगरोड प्रकल्पाला 'डबल बूस्ट', जमीन व्यवहार शुल्क माफ; एनएमआरडीएची ६०० कोटींची होणार बचत

Satara Accident: विहिरीतील खोल पाण्याने घेतला चिमुकल्याचा बळी; आई बचावली, मुलाचा मृत्यू, दहिवडीत हृदयद्रावक घटना

'तीन ब्राऊनी आणि पिझ्झा हे...' सारा अली खानने कसं घटवलं 45 किलो वजन, म्हणाली...

SCROLL FOR NEXT