viral video sakal
Trending News

Viral Video: जा बाई एकदाची सासरी! माहेरच्यांनीच उचलून बसवलं गाडीत

नवरीची अशी पाठवण कधी पाहिली नसेल? बळजबरीनं गाडीत बसवलं

सकाळ डिजिटल टीम

दर दिवशी सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक नवरीचा पाठवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंंड व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य आणि कदाचित हसू येईल. या व्हिडीओमध्ये माहेरचे लोक नवरीची बळजबरीनं पाठवणी करताहेत.

सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लग्न समारंभ आटोपल्यानंतर नवरीची पाठवणी सुरु आहे. पाठवणीत नवरी जशी रडते तसंच ही नवरीसुद्धा रडतेय मात्र रडताना ती इतकी इमोशनल होते की तिला सासरी जावंस वाटत नाही आणि ती सासरी जाण्यास नकार देते. तेव्हा नवरीला चक्क माहेरच्यांनीच उचलून गाडीत बसवलं.

भारतीय संस्कृतीत लग्नानंतर पाठवणीच्या वेळी मुलगी रडत असते. पण या व्हिडीओतील नवरी इतकी भावूक होते की सासरी जाण्यास नकार देते. मात्र माहेरचे जेव्हा उचलून तिला गाडीत बसवतात तेव्हा व्हिडीओ पाहणारे सर्वजण थक्क होतात आणि अलगद हसू फुटते.

सदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. इंस्टाग्रामवरील bridal_lehenga_designn या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT