Summer Temperature
Summer Temperature esakal
Trending News

Summer Temperature : अरे बापरे! पृथ्वीवर या ठिकाणी असा उकाळा की सर्वाधिक तापमान 70 डिग्रीच्या घरात..

सकाळ डिजिटल टीम

Summer Temperature : उन्हाळ्याचं नाव ऐकताच अनेकांचा जीव घाबरायला लागतो. अनेकांना वाढत्या उन्हाने जीव घाबरणे, बीपी लो होणे, चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात प्रत्येक भागातील तापमानात काही अंशाचा फरक असतो. मात्र एप्रिल मे चे तापमान हे सर्वाधिक मानले जाते. मात्र पृथ्वीवर एक ठिकाण असेही आहे जेथे सर्वाधिक तापमान असते. ४०-५० डिग्री तापमान येथे फार नॉर्मल मानल्या जातं. तर येथील सर्वाधिक तापमानाने ७० डिग्रीची उंची गाठली आहे.

जगातील सर्वात उष्ण ठिकाणे

इराणच्या बंदर-ए-महशहर शहरात जुलै 2015 मध्ये कमाल तापमान 74°C नोंदवले गेले. यापूर्वी येथे कमाल तापमान 51 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. यानंतर इराणच्या दश्त-ए-लूटमध्ये 2003 ते 2009 दरम्यान 70.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. यावेळी हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य आहे, येथे एकही मनुष्य राहत नाही.

किबुटज शहर

इस्रायलमधील तिरात झ्वी येथील किबुटज शहरात जून १९४२ मध्ये कमाल तापमान ५४ डिग्री सेल्सियसवर पोहोचले. कमी उष्ण दिवसातही येथील सरासरी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहते.

वाडी हाल्फा शहर

सुदानच्या वाडी हाफ शहरात पाऊस पडत नाही. जून महिन्यात सर्वात जास्त उष्ण येथे जाणवतं. येथील सरासरी तापमान ४१ अंश सेल्सिअस राहते. एप्रिल 1967 मध्ये येथे 53°C तापमानासह सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला.

टिंबकटू शहर

सहाराच्या दक्षिणेकडील मालीमधील टिंबकटू शहर हिवाळ्यातसुद्धा उबदार राहते. जानेवारीतही येथे सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअस राहते. आतापर्यंत त्याचे कमाल तापमान ४९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.

घडामेस आणि केबिली

लिबियाच्या वाळवंटाच्या मध्यभागी असलेल्या घडामेसचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस असते. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये देखील समाविष्ट आहे. येथे कमाल 55 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय ट्युनिशियातील केबिली या वाळवंटी शहराचे सरासरी तापमानही ४० अंश आहे. येथेही कमाल तापमान ५५ अंश सेल्सिअस आहे.

डेथ व्हॅली

कॅलिफोर्नियाची डेथ व्हॅली जगातील सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये गणली जाते. 1913 मध्ये येथील तापमान 56.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. येथील सरासरी तापमान ४७ अंश सेल्सिअस आहे. डेथ व्हॅली अमेरिकेतील सर्वात कोरड्या ठिकाणांमध्ये गणली जाते. (summer)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT