sun esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : उष्माघातप्रवण जिल्ह्यात धुळ्याचा समावेश; दक्षतेची गरज

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्याच्या आपत्ती निवारण विभागाने खानदेशातील धुळे व जळगाव जिल्ह्यांचा उष्माघातप्रवण जिल्ह्यात समावेश केला आहे. (heat stroke prone district Included dhule news)

राज्यात सुमारे १५ जिल्हे उष्माघातप्रवण असल्याचे अभ्यासातून दिसून आल्याचे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी तयार केलेल्या कृती आराखड्यातून स्पष्ट झाले आहे.

उष्माघाताचा विचार करताना तापमानाव्यतिरिक्त हवेतील आर्द्रता, धुळीचे कण व हवेचे प्रदूषण यांसारखे मुद्दे विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून नियोजन करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना दिले आहेत.

सलग दोन दिवस सामान्य तापमानापेक्षा ४.५ सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची वाढ झाली तर ती उष्णतेची लाट असे समजून होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

गेल्या २५ वर्षांपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून तीव्र, मध्यम व कमी स्वरूपाच्या उष्णतेच्या लाटेचे काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास केला जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, उत्तर भारतात दर वर्षी पाच ते सहा वेळा उष्णतेची लाट येते.

त्याचा फटका थेट पाण्याच्या उपलब्धतेवर होतो. दरडोई पिण्याचे पाणी एक हजार ८२० घनमीटर उपलब्ध होते. ते आता केवळ एक हजार १४० घनमीटर एवढेच उपलब्ध होणार आहे. २०१५ मध्ये राज्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्या वेळी सहा ते आठ सेल्सिअस अंश इतके तापमान वाढले होते.

मानवी शरीरावर विशेषतः झोपडपट्टीत राहणारे, रस्त्याशेजारील विक्रेते, फिरते विक्रेते, बाजार समितीमध्ये काम करणारे, आठवडा बाजारातील विक्रेते, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रेच्या ठिकाणी, विविध धार्मिक स्थळे या ठिकाणी भेट देणारे, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यावर उष्णतेचा अधिक परिणाम होतो. त्यामुळे या अनुषंगाने काळजी घेण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

धुळ्याचा पारा वाढला

दरम्यान, यंदाचा उन्हाळा सुरू झाल्यानंतर अधूनमधून अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने जिल्ह्यासह धुळे शहरातील तापमानाचा पारा तुलनेने सामान्य होता. दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांत हा पारा वर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे विशेषतः दुपारी धुळे शहरातील अनेक रस्त्यांवरची वर्दळ मंदावल्याचे पाहायला मिळते. गेल्या सहा दिवसांतील तापमान असे ः ८ एप्रिलला ३९.० (कमाल), तर १७.६ (किमान) अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर ९ एप्रिलला (३५.५-१७.४), १० एप्रिलला (३८.०-१९.२), ११ एप्रिलला (३९.०-१९.०), १२ एप्रिलला (४०.०-२०.४), १३ एप्रिलला (४१.०-२२.०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT