उत्तर महाराष्ट्र

"कोरोना' मुक्तीसाठी ते लढले... आणि सर्वोधर्मीय नागरिकांनी केला त्यांचा सन्मान ! 

सकाळवृत्तसेवा

शहादा  : कोरोनापासून शहर व परिसरातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी महसूल, पोलिस, नगरपालिका, आरोग्य प्रशासन अहोरात्र राबले. शहरातील पाच अधिकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचा कोविड योद्धा म्हणून शहरातील महिलांनी औक्षण करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. शहरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांतर्फे प्रमुख रस्त्यावर फुलांचा वर्षाव करून अधिकाऱ्यांचा सन्मान केला. 

येथील राष्ट्रीय सेविका समिती, वैश्य सुवर्णकार महिला समिती, वैष्णव सुवर्णकार समाज मंडळ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जामा मशीद ट्रस्ट यांच्यातर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून यथोचित सत्कार करण्यात आला. 

पुष्पवृष्टी अन औक्षण... 
सकाळी शहरातील सराफ गल्लीजवळील टिळक चौकात कोरोनाच्या विरोधात लढा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहिरपणे सन्मान झाला. प्रथम जामा मशीद चौकात मुस्लिम समाज बांधवांतर्फे सन्मान करून पुष्पवृष्टी करण्यात आली. असंख्य मुस्लिम समाज कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी टाळ्या वाजवून अधिकाऱ्यांचे कौतुक केले. नंतर जामा मशीद ते मेन रोड मार्गे टिळक चौकापर्यंत अधिकाऱ्यांना पायी आणण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किराणा दुकानदार, कापड विक्रेते, लहान-मोठे उद्योग व्यवसाय करणारे व्यापारी, महिलांनी थेटपर्यंत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. टाळ्या वाजवल्या जात होत्या हा सारा प्रकार बघून अधिकारीवर्ग भारावून गेले होते. पुढे टिळक चौकात पोहोचल्यानंतर सुवर्णकार समाजातील महिलांनी अधिकाऱ्यांचे औक्षण करून मिठाई दिली. 

यांचा केला सन्मान.... 
प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलिस निरीक्षक किसन पाटील, शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर, म्हसावदचे पोलिस निरीक्षक किरण पवार, शहाद्याचे पोलिस कार्यालयातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, निलेश वाघ ,भगवान कोळी ,विक्रांत कचरे, कैलास माळी , शहादा महावितरण वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता सुजित पाटील यांच्या सन्मान करण्यात आला. 

मुस्लिम समाजातर्फे स्वागत.... 
जामा मशिदीचे मौलाना मुक्ती उस्मान, प्रा. लियाकत सय्यद, अल्ताफ मेमन, डॉ.अजहर पठाण,मजीत खान, प्राचार्य डॉ. खालील शहा, विकार सर, गुलाम रसूल बागवान, फारुक बागवान, जहांगीर बागवान ,इक्बाल शेख, सय्यद नईम, रफिक मुन्शी, रफिक मेकॅनिकल यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कौतुक केले. डॉ. लक्ष्मण सोनार यांनी प्रास्ताविक, डॉ. हेमंत सोनी सूत्रसंचालन केले. डॉ. लक्ष्मण सोनार यांनी आभार मानले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Latest Marathi News Update: उजनी धरणात पडलेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह सापडले

HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

दोघांना शोधायला गेले अन् पाच जण बुडाले; प्रवरा नदीत नेमकं काय घडलं?

Yed Lagla Premach: अतिशा नाईक पुन्हा साकारणार खलनायिका; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

SCROLL FOR NEXT