Dhule: A Municipal Corporation team on Wednesday sealed the mobile tower in Budgujar Plot area, Prabodhankar Thackeray Complex for non-payment of property tax arrears esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : थकबाकीदारांचे डोळे पुन्हा ‘शास्तीमाफी’ कडे!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेकडून अधूनमधून कारवाई सुरू आहे. यात बुधवारी (ता. ११) कारवाई पथकाने एक मोबाईल टॉवर व व्यापारी संकुलातील एक गाळा सील करण्याची कारवाई केली.

चालू मालमत्ता करासह थकबाकी भरण्यास अद्यापही नागरिक अपेक्षेनुरूप पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून दर वर्षी महापालिकेकडून शास्तीमाफीची घोषणा केली जाते. या शास्तीमाफी योजनेमुळे अनेक थकबाकीदार कर भरण्यास पुढे येत नसल्याचेही सांगितले जाते. (Municipal Corporation action against Arrears Mobile tower Gale seal Citizens Come forward to pay property tax Dhule News)

मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिकेच्या कारवाई, जप्ती पथकांकडून अधूनमधून कारवाई सुरू आहे. या प्रक्रियेत बुधवारी महापालिकेच्या पथकाने शहरातील बडगुजर प्लॉट भागातील माधव कॉलनीत मोबाईल टॉवर मालमत्ता कर थकल्याने कारवाई केली.

व्हिजन कंपनीच्या या मोबाईल टॉवर करापोटी कंपनीकडे तीन लाख २९ हजार रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी कंपनीने अदा केली नाही, त्यामुळे पथकाने मोबाईल टॉवरची यंत्रणा सील केली. दरम्यान, संबंधित कंपनीच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून थकबाकी भरण्याची तयारी दर्शवून कारवाई न करण्याची विनंती केली, मात्र अधिकाऱ्यांनी थकबाकी अदा केल्याशिवाय कारवाई मागे न घेण्याची भूमिका घेत टॉवरची यंत्रणा सील केली.

तसेच पथकाने शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील गाळेधारकावरही कारवाई केली. या संकुलातील विनोद गोविंदराम यांच्याकडील गाळ्यापोटी ९४ हजार रुपये मालमत्ता कर थकबाकी असल्याने व गाळेधारकाने ती न भरल्याने पथकाने गाळे सील केले. महापालिकेचे वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, निरीक्षक मधुकर वडनेरे, संजय भडागे, अजय देवरे, बशीर मुर्तजा, मनोज चिलंदे यांच्या पथकाने या दोन्ही कारवाया केल्या.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

शास्तीमाफीची प्रतीक्षा?

शहरातील मालमत्ताधारकांकडे तब्बल ६५ कोटी मालमत्ता कर व ३६ कोटी रुपये पाणीपट्टी अशी तब्बल १०१ कोटी रुपये थकबाकी आहे. वर्षानुवर्षे कायम राहणारी ही थकबाकी वसूल करताना महापालिकेच्या यंत्रणेला नाकीनऊ येत आहे. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत यातील जास्तीत जास्त थकबाकी तसेच चालू मागणी वसूल करण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. अनेक मालमत्ताधारक स्वतःहून त्यासाठी पुढेही येतात.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून शास्तीमाफीची घोषणा केली जाते. मालमत्ता कर शास्तीवर ७५, ५० टक्के सूट दिली जाते. बऱ्याचदा शंभर टक्के सूटही देण्यात येते. दर वर्षी मिळणाऱ्या या शास्तीमाफी योजनेचा अनेक मालमत्ताधारक लाभ घेत असतात. त्यामुळे शास्तीमाफीची घोषणा होईल या अपेक्षेने अनेक जण इच्छा असूनही मालमत्ता कर अदा करण्यास पुढे येत नाहीत असे एक निरीक्षण आहे. यंदाही अशाच प्रतीक्षेमुळे मालमत्ताधारकांकडून कर भरण्यासाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT