Dhule: Police officers and a team of staff present with the suspects in custody in the Bagul murder case. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मामेभावांकडून यशवंतचा खून; दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील यशवंत सुरेश बागूल (वय ४०, रा. मिलिंद सोसायटी, कुमारनगर, साक्री रोड) यांच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांचा मामेभावांनीच खून केल्याचे तपासात उघड झाले.

एलसीबी आणि धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने चोवीस तासांत खुनाचा छडा लावत संशयित दोघांना गजाआड केले. (Murder of Yashwant by maternal brother Two arrested police solved incident within 24 hours Jalgaon News)

यशवंत बागूल यांचा उभंड- पिंपरखेड (ता. धुळे) मार्गावर पिंपरखेड बारीत गोळ्या झाडून, चाकूचे वार करत २५ मेस खून झाला.

यशवंत बागूल आणि त्यांच्या मामाचा मुलगा पंकज मोहिते हे दोघे डाळिंबाच्या शेतीसाठी मजूर शोधून रात्री आठच्या सुमारास परतत असताना ‘अण्णा थांब’, असा आवाज देत दोन जणांनी यशवंत यांच्यावर गोळ्या झाडल्या.

तसेच चाकूने वार करून खून केला, अशी माहिती यशवंत यांच्यासोबत असलेल्या पंकज मोहिते याने मृताची पत्नी आशाबाई बागूल यांना दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तपासासाठी पथके

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाने एलसीबी आणि धुळे तालुका पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, प्रकाश पाटील, संजय पाटील, दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनील पाटील, राजू गिते, कैलास महाजन तर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, अनिल महाजन, सुनील विंचूरकर, प्रवीण पाटील, किशोर खैरनार, मुकेश पवार, धीरज सांगळे, कुणाल शिंगाने, अमोल कापसे, राकेश मोरे, प्रमोद पाटील, नितीन दिवसे, कांतिलाल शिरसाट यांनी तपासास सुरवात केली.

रक्ताच्या डागामुळे संशय

पथकाने खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी पंकज मोहिते याची कसून चौकशी केली. पंकज मोहिते आणि आनंद मोहिते (दोघे रा. उभंड नांद्रे ता.धुळे) यांना ताब्यात घेत सखोल विचारपूस केली असता पंकजने खुनाची कबुली दिली.

यशवंत बागूल यांच्याकडून कुटुंबाला सतत मानसिक त्रास होत असल्याने रागाच्या भरात त्यांना ठार केल्याचे पंकज आणि आनंद याने सांगितले. खुनाच्या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी पंकज याच्या जबाबात तफावत निर्माण झाली.

त्याच्या म्हणण्यानुसार ‘अण्णा’ अशी हाक मारून दोघांनी यशवंत यांना जवळ बोलाविले व त्यावेळी यशवंतचा खून केला. मात्र, पंकजच्या कपड्यांसह दुचाकीवर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला.

तपासात खुनाची कबुली

खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर पंकजला विविध प्रश्न विचारले. त्याच्याकडून मिळालेल्या उत्तरांतून पोलिसांचा पंकजवर संशय बळावला.

त्याला बोलते केले असता त्याने आनंद मोहितेच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासाबाबत पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक राम सोमवंशी यांनी संयुक्त पथकाची प्रशंसा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT