rains in the western part of the heavy rain are overflowing with small and large streams. (Photograph: Vijay Pagare) esakal
नाशिक

Nashik Rain Update : महाराष्ट्राच्या चेरापुंजीत 24 तासांत 92 मिमी पाऊस; धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : महाराष्ट्राची चेरापुंजी तथा पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात वरुणराजाने आपली मर्जी दाखवत सलग जोरदार वृष्टी सुरू केली आहे.

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधारेसह संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील भावली, भाम व दारणा धरणांच्या साठ्यात भरीव वाढ झाली.

त्यामुळे तालुक्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजाही सुखावला आहे. गेल्या २४ तासांत ९२ मिलिमीटरची बरसात केली असून, आजअखेर तालुक्यात दोन हजार ७८२ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. (92 mm rain in 24 hours in Igatpuri nashik rain news)

इगतपुरी तालुक्यात गुरुवार (ता. ७)पासून इगतपुरी शहरासह घोटी व भावली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. गुरुवारपासून आजही हा पाऊस कायम आहे. या पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. कसारा घाटातही मुसळधार पावसासह धुक्याचे साम्राज्य पसरले आहे.

तालुक्यात सर्वत्र समप्रमाणात पाऊस झाल्याने समाधानासह गारव्याचे वातावरण पसरले. तालुक्यात दोन दिवसांत संततधारेसह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच धरण साठ्यात चांगलीच वाढ झाली. भावली धरण तर गेल्या महिनाभरापासून ओसंडून वाहत आहे; तर दारणा धरणात ८८ टक्के साठा उपलब्ध झाला.

यामुळे तालुक्यात २४ तासांत ९२ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यातील दारणा, भाम व भावली या नद्यांसह लहान-मोठे ओहोळ व खाचखळगे प्रवाहित झाले आहेत. शहरासह तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे पहिल्या २४ तासांत २७ मिलिमीटर, तर दुसऱ्या २४ तासांत ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पश्चिम भागात जोरदार बॅटिंग

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने समाधानकारक वृष्टी केल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसाची सर्वत्र हजेरी उत्साह देणारी ठरली. दरम्यान, या पावसामुळे सर्वच घटकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील त्रिंगलवाडी, बलायदुरी, आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली, गिरणारे, टिटोली, नांदगाव सदो, पिंपरी सदो, तळेगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे, इंदोरे, काळुस्ते, शेनवड, मुंढेगाव, माणिकखांब या भागातही शुक्रवारी समाधानकारक पाऊस झाला आहे.

धरणातील साठा (शुक्रवारअखेर)

दारणा : ८७.५८ टक्के

मुकणे : ७८.४७ टक्के

वाकी : ६७.९४ टक्के

भावली : १०० टक्के

भाम : १०० टक्के

कडवा : ८४.५४ टक्के

वालदेवी : १०० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT