Another case filed against Omya Khatki cidco nashik crime news esakal
नाशिक

Nashik Cidco Crime : सिडकोत भरदिवसा खून करणाऱ्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल; कॉलेजरोडला एकाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Cidco Crime : टिप्पर टोळीच्या नावाखाली सिडको, पंचवटीत दहशत माजाविणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वीच फिल्मी स्टाईलमध्ये सिडकोतील शिवाजी चौकात संदीप आठवले यांचा भरदिवसा खून करणाऱ्या संशयित ओम्या उर्फ छोटा खटकी उर्फ ओम चौधरी याच्यासह तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा प्रकार कॉलेजरोड परिसरातील चाय केटली कॅफे येथे घडला होता. (Another case filed against Omya Khatki cidco nashik crime news)

प्रणव प्रभाकर आगळे (रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड. मूळ रा. गवळी पिंप्री, ता. सोनपेठ, जि. परभणी) याच्या फिर्यादीनुसार, गेल्या १८ तारखेला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तो कॉलेज रोडवरील चाय केटली कॅफेत बसलेला होता.

त्यावेळी संशयित ओमप्रकाश पवार उर्फ खटकी, ओम चौधरी उर्फ छोट्या खटकी, मॅगी मोरे, प्रणय पगार (सर्व रा. सिडको) हे त्याठिकाणी आले. मागील भांडणाची कुरापत काढून संशयितांनी प्रणव आगळे यास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. परंतु संशयितांच्या दहशतीमुळे त्याने पोलिसात तक्रार केली नव्हती.

दरम्यान, गेल्या गुरुवारी (ता.२४) संशयितांनी सिडकोत संदीप आठवले याचा खून केला. त्याप्रकरणात संशयितांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे प्रणव आगळे याने गंगापूर पोलिस ठाणे गाठून संशयितांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पर टोळीच्या नावाने दहशत

संशयित ओम्या खटकी हा सिडकोतील कुख्यात टिप्पर टोळीच्या नावाखाली दहशत माजवित होता. अल्पवयीन असल्यापासून त्याच्यावर मारहाणी, धमकावणे, चोऱ्यांचे गुन्हे दाखल आहेत. मात्र अल्पवयीन असल्याने कठोर कारवाई होत नसल्याने त्याची मुजोरी वाढली.

त्यातूनच त्याने गेल्या गुरुवारी संदीप आठवले याचा पूर्ववैमनस्यातून भरदिवसा खून केला. ओम्या खटकीचे काही मित्र हे पंचवटी परिसरातही असल्याने त्याही भागात त्याने दहशत माजविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT