Apples on a tree planted on the premises of MVP College of Agriculture. esakal
नाशिक

Nashik News : अबब... सफरचंद पिकले, तेही नाशिक जिल्ह्यात..!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आरोग्‍यासाठी पौष्टिक समजल्या जाणाऱ्या सफरचंदाची आवक मुख्यत्‍वे जम्‍मू व काश्मीर भागातून येत असते. परंतु, जिल्ह्या‍तील चाचडगाव (ता. दिंडोरी) या नाशिकच्‍या भूमीत सफरचंद पिकविण्यात यश आले आहे.

मराठा विद्याप्रसारक संस्‍थेच्‍या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ‘हरमन ९९’ या काश्मिरी सफरचंद प्रजातीची लागवड करण्यात आली. या प्रयोगास यश आले आहे. (Apples on a tree planted on premises of MVP College of Agriculture nashik news)

महाविद्यालयातर्फे चाचडगाव प्रक्षेत्रात सफरचंदांची लागवड करण्यात आली होती. झाडाला पहिल्यांदाच सफरचंद लागले आहेत.

या कामगिरीतून संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचे जिल्हाभरातील शेतकरी सभासद, हितचिंतकांकडून कौतुक होत असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोकणगाव येथील प्रक्षेत्रावर सफरचंदाबरोबरच अननस, आंब्याच्या सात प्रकारच्या जाती, जायफळ, कोकम, दालचिनी, नारळाच्या विविध जाती, लेमन ग्रास, फणस, पेरू, लिंब व इतर वनस्पतींचीही प्रयोगशील लागवड महाविद्यालयातर्फे करण्यात आलेली आहे. हे प्रयोगही यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत.

त्यासाठी सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. त्यात आंतरपिकेही घेतली जातात. तसेच, या ठिकाणी रोपवाटिकाही उभारलेली असून, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तज्‍ज्ञ मार्गदर्शकांची मदत घेत शेतीचा विकास करण्याबाबत प्रयोग सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT