Heatstroke  Maharashtra
Heatstroke Maharashtra  Sakal
नाशिक

Heat Stroke Care : उष्माघाताची काळजी नको, पण उपाययोजना हव्यात!

सकाळ वृत्तसेवा

"नाशिक शहर तसेच परिसरात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. उष्माघातापासून बचावासाठी काही उपाययोजना या करायला हव्या." - डॉ. चेतन पाटील, एमडी

(dr chetan patil article about heat stroke summer heat care nashik)

उष्माघात होण्याची कारणे

- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे

- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे

- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

- घट्ट कपड्याचा वापर करणे

- अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताची लक्षणे

- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे

- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे

- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तातडीने करायचे उपचार

- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकूलित खोलीत ठेवावे

- रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत

- रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी

- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आइसपॅक लावावेत

- आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन देणे

उन्हाचा फटका बसल्यास काय करावे?

- तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत- जास्त पाणी प्यावे

- हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत

- बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावा

- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी

- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा

- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

- गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे

- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे

- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी

- सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे

- पहाटे जास्तीत- जास्त कामाचा निपटारा करावा

- बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा

- गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी

- रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत

- जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी

उष्माघातामध्ये काय करू नये?

- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये

- दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे

- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे

- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत

- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT