नाशिक : (दहीवड) "वाट पाहीन पण एसटीनेच जाईल'' ही एसटीबाबत प्रवाशांना मनात असलेली भावनेला अपघातांमुळे तडा जात असून काही दिवसांपूर्वी मेशी धोबीघाट परिसरातील दुर्घटनेमुळे संदिग्धता वाढली आहे. एसटीच्या प्रवासात अनेक प्रवाशांनी मृत्यूच्या दाढेतला प्रवास अनुभवला आहे.
एसटीचा प्रवास काळ्याभीन्न अंधारात पूर्णपणे रामभरोसे
धुळे - कळवण या एसटीच्या भीषण अपघातात 26 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. एकंदरीत पाहता एसटीचा प्रवास काळ्याभीन्न अंधारात पूर्णपणे रामभरोसे झाला आहे. सातत्याने सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीने अनेक जणांचे बळी घेतले आहेत. सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी, ग्रामीण भागाची जीवन वाहीनी असलेली एसटी आधीच आजारी आणि इच्छित स्थळास पोहचणेही एसटीच्या आजारपणाने अनिश्चित झाले आहे. दृष्टीदोष असलेले असो वा दिव्यांग असो, महिला असो वा पुरुष असो, म्हातारा असो वा तरुण असो, लहान असो वा मोठा असो कोणताही भेदभाव न करता सर्वांना वर्षानुवर्षे एकत्र घेवून आपले दुखने सहन करीत व गती रोधकावरुनही सुसाट धावणारी एसटीचा खडखडाट झाला आहे.
रस्त्यात मध्येच गाडी बंद पडण्याचे प्रमाणतही वाढ
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरु पाहत आहे. आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात असल्याने गाड्यांच्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यात मध्येच गाडी बंद पडण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामूळे प्रवाशांची अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित वाटणाऱ्या प्रवासाबद्दल असुरक्षितता वाटू लागली आहे.
कळवण आगारात सात अपघात
कळवण आगारकडून मिळालेल्या माहितीनुसार 2019 या वर्षात आगाराचे एकूण सात अपघात होतऊ त्यांत तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. सातपैकी दोन अपघातांमध्ये बस चालक तर उर्वरित अपघातांमध्ये दुसऱ्या वाहनांचे चालक जबाबदार होते. सातपैकी पाच अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
जुन्या एसटी बसची दयनीय अवस्था पाहायला मिळते. त्यामध्ये खिडक्यांना काचा नसणे, आतील आसन व्यवस्थेची दुरवस्था झाल्याची दिसून येत आहे. एसटी गाड्या महामार्गावर बंद पडून एक प्रकारे एसटी महामंडळाची बदनामी होते. संबंधित विभागाने वाहनांच्या उणीवा व त्यांचा गरजा ओळखून त्यांची दुरुस्ती वेळीच करावी अन्यथा नवीन वाहनांची तजविज करावी. - प्रा. शुभम पाटील, प्रवाशी
एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने रोज बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. लांब पल्ल्याच्या या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून लांबच्या प्रवसासाठी एस टी महामंडळाने चांगल्या बस उपलब्ध करून द्यायला हव्यात. - मनेश ब्राम्हणकर, दहीवड
मध्यवर्ती कार्यालयाकडून नवीन गाड्यांचे वाटप केले जाते. आम्ही नवीन गाड्यांचा मागणी अहवाल मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविला त्यानुसार मागील दोन महिन्यां मध्ये 22 नवीन गाड्या प्राप्त झाल्या आहेत. - नितीन मैंद, विभागीय नियंत्रक, नाशिक.
हेही वाचा > VIDEO : वायूप्रदूषणाचा गंभीर प्रश्न..विद्यार्थ्यांचे हेल्मटमधून "अनोखे' संशोधन!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.