Fodder of animals consumed in fire caused by lightning esakal
नाशिक

Nashik Rain Update : वीज पडून लागलेल्या आगीत जनावरांचा चारा खाक

अजित देसाई

Nashik News : सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथील शेतातजनावरांना चारा म्हणून साठवून ठेवलेला सोयाबीनचा भुसा वीज पडून लागलेल्या आगीत खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

आग लागली तेव्हा परिसरात वादळ सुरू असल्याने आग विझविण्यासाठी कोणालाही पुढे जाता आले नाही. सिन्नर येथून नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली मात्र हाती काहीच उरले नाही. (Fodder of animals consumed in fire caused by lightning Nashik Rain Update News)

दुसंगवाडी शिवारात गट नंबर 139 मध्ये सेवानिवृत्त शिक्षक दगडू बाबुराव ढमाले यांचे शेत आहे. तेथे त्यांनी शेतातून काढणी केलेल्या सोयाबीनचा भुसा जनावरांना चारा म्हणून साठवून ठेवला होता. टोमॅटोचे ड्रीप, बांबू देखील शेजारी रचून ठेवले होते.

रविवारी दुपारी सिन्नरच्या पूर्व भागात वादळ सुरू होते. यादरम्यान आकाशात विजा देखील कडाडत होत्या. एक वाजेच्या सुमारास वीज पडल्याचा आवाज होऊन श्री ढमाले यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या भुसाच्या गंजीने अचानक पेट घेतला.

वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. वादळात आग विझविण्यासाठी कोणी पुढे झाले नाही, शिवाय परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. वादळ थांबायचे नाव घेत नसल्याने आणखी नुकसान टाळण्यासाठी सरपंच कानिफनाथ घोटेकर यांनी सिन्नर येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलास मदतीची विनंती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिन्नर येथून आलेल्या बंबाने आग विझवली. मात्र तोपर्यंत चारा, बांबूचा ढिगारा, ड्रीपच्या नळ्या जाळून खाक झाल्या होत्या. या घटनेत श्री ढमाले यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कांद्याचा ढीग सुरक्षित...

आग लागलेल्या ठिकाणी काही अंतरावर नुकताच काढणी केलेला उन्हाळ कांदा पातीखाली झाकून ठेवण्यात आला होता. मात्र या ढिगाऱ्यापर्यन्त आग पोहचू शकली नाही. वाऱ्याने एखादी ठिणगी देखील या ठिकाणी पडली असती तर श्री ढमाले यांचे आणखी नुकसान झाले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT