Savitribai phule Pune University  sakal
नाशिक

Phule University Result : निकालातील गोंधळ संपेना! अंतर्गत गुण चुकवले, पुणे विद्यापीठातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Phule University Result : विधी व अभियांत्रिकीपाठोपाठ अन्‍य काही अभ्यासक्रमांच्‍या निकालात गोंधळ झाल्‍याची बाब निदर्शनास येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे निकालातील घोळ काही संपायच्या स्‍थितीत नसल्‍याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्‍यक्‍त होत आहे.

नुकताच समोर आलेल्‍या एका प्रकरणात अंतर्गत गुणांची नोंदणी चुकीच्‍या पद्धतीने झाल्‍याचे महाविद्यालयाने विद्यापीठाच्‍या निदर्शनास आणून दिले आहे. (in phule university Internal marks were registered incorrectly nashik news)

यापूर्वी विधी शाखेतील एलएलबी अभ्यासक्रमांतील पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना भरघोस गुण, तर परीक्षेस उपस्‍थित विद्यार्थ्यांना थेट गैरहजर दाखविल्‍याचा अजब प्रकार समोर आला होता. अभियांत्रिकीचा निकालात तांत्रिक त्रुटीमुळे सुधारित निकाल जाहीर करावा लागला होता. त्‍यापाठोपाठ नुकताच आणखी एक प्रकार निदर्शनास आला आहे.

जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील अंतिम वर्ष बीए अभ्यासक्रमातील दहा विद्यार्थ्यांचे एका विषयातील अंतर्गत गुण तांत्रिक कारणाने चुकीचे झाल्‍याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यासंदर्भात संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठास पत्राद्वारे कळविले असून, सोबत गुणांची मूळ प्रत सादर केलेली आहे. हा अंतिम वर्षाचा निकाल असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या भवितव्‍याचा विचार करून तातडीने हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे केलेली आहे.

डेडलाइन पाळताना होताय चुका

राज्‍यपालांच्‍या सूचनेनुसार अंतिम वर्षाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करणे अपेक्षित होते. ही डेडलाइन पाळताना होत असलेल्‍या घाई, गोंधळामुळे विद्यापीठ पातळीवर चुका होताय का? ही बाब तपासण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे. निकालांमध्ये होत असलेल्‍या चुकांतून विद्यार्थ्यांना मनस्‍ताप सहन करावा लागत असल्‍याने विद्यापीठाने काळजीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करण्याचीही गरज विद्यार्थी व पालकांकडून व्‍यक्‍त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT