Aadhar Card Esakal
नाशिक

चाचणीपासून स्मशानभूमीपर्यंत ‘आधार’ झेरॉक्स गरजेचे

हल्ली सर्वत्र कोरोनाचा उद्रेक सुरू आहे.

दत्ता जाधव : सकाळ वृत्तसेवा

कडकडीत लॉकडाउनमुळे शहरातील अनेक ठिकाणच्या झेरॉक्स दुकानदारांना व्यवसायच बंद ठेवावे लागत असल्याने ‘कोणी झेरॉक्स देते का झेरॉक्स’ असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.

पंचवटी (नाशिक) : कशामुळे अन् कोणामुळे कोणत्या गोष्टीला महत्त्व येईल, हे सांगता येत नाही. हल्ली सर्वत्र कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्यातच रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागापासून ते थेट स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी संबंधितांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी लागते. परंतु कडकडीत लॉकडाउनमुळे शहरातील अनेक ठिकाणच्या झेरॉक्स दुकानदारांना व्यवसायच बंद ठेवावे लागत असल्याने ‘कोणी झेरॉक्स देते का झेरॉक्स’ असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर आली आहे.

वाढत्या संसर्गाने हादरून गेलेले प्रशासन रोज नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यातच शासनाने निर्धारित केलेल्या सकाळी सात ते अकरादरम्यान अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या व्यवसायांना परवानगी दिली आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवेत झेरॉक्स व्यवसाय मोडत नसल्याने अनेक झेरॉक्स व्यावसायिकांनी काही दिवसांपासून दुकानेच बंद ठेवली आहेत. त्यामुळे अधिक पैसे मोजूनही झेरॉक्स मिळणे अवघड बनले आहे.

मात्र, शासनाच्या निर्देशानुसार हल्ली कोरोनासाठी कोणतीही चाचणी करायची म्हटली तरी आधारकार्डची झेरॉक्स आवश्‍यक असल्याचे सांगितले जाते. ही बाब माहीत नसल्याने अनेकजण फक्त मूळ आधारकार्ड घेऊन संबंधित ठिकाणे गाठतात. त्यामागे संबंधित ठिकाणी चाचणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा असते. परंतु संबंधितांकडे आधार किंवा अन्य कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीची मागणी केली जाते. संबंधितांना याची कल्पना नसल्याने झेरॉक्स काढणाऱ्या दुकानांची शोधाशोध सुरू होते. मात्र, कडक निर्बंधामुळे अनेक दुकाने बंदच असल्याने झेरॉक्स प्रत मिळणे अवघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक न्यायालयाच्या आसपास जवळपास पन्नासच्या आसपास झेरॉक्स दुकाने असूनही नियमांमुळे अकरा वाजता दुकाने बंद होत असल्याने संबंधितांना मोठी पायपीट करावी लागत आहे.

नागरिकांना मनस्ताप

हल्ली कोणत्याही रुग्णालयात गेल्यास प्रथम संबंधितांच्या झेरॉक्स प्रतीची मागणी केली जाते. अशावेळी झेरॉक्स नसल्यास मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय कोणत्याही टेस्टसाठी झेरॉक्स प्रत अनिवार्य केल्यामुळे झेरॉक्सला पर्यायच नसल्याचे संबंधितांच्या लक्षात येते. याशिवाय स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एखादा मृतदेह नेल्यावरही संबंधितांच्या मृत्यूच्या दाखल्यासह आधाराच्या झेरॉक्सची मागणी केली जाते. अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना उद्या लवकर आणून देतो, अशी विनवणी केली जाते.

मध्यरात्री कुठे मिळणार झेरॉक्स

मध्यंतरी मेरी-म्हसरूळ परिसरातील एकाचे मध्यरात्री निधन झाल्यावर संबंधितांनी मृतदेहासह जिल्हा रुग्णालय गाठले. तेव्हा झेरॉक्सची मागणी करण्यात आली. मध्यरात्री कोण झेरॉक्स देईल, असे विचारले असता बाहेरच्या टपरीवर २४ तास सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र संबंधित दुकानदाराला उठविण्यात दीड-दोन तास गेल्यावर त्याने चिडचिड करत झेरॉक्स काढून दिल्या. पण यादरम्यान संबंधितांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT