Chief Minister Eknath Shinde giving instructions in a meeting held on Friday to solve the traffic jam on the Nashik-Mumbai highway. esakal
नाशिक

Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई वाहतूक कोंडी दूर होणार; मुख्यमंत्र्यांचे बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik Mumbai Highway : नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली.

त्यात अवजड वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आला. नाशिक व भिवंडीच्या सीमेवर वाहनतळ उभारून ही अवजड वाहने थांबविण्यात येतील. (Nashik Mumbai Highway traffic problem Parking lot on border of Nashik Bhiwandi for heavy vehicles news)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांसह विविध सदस्यांनी नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत विधिमंडळात आवाज उठविला होता. शुक्रवारी (ता. २८) याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले.

नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र बनला आहे. मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. कल्याण फाटा, भिवंडी नाका या भागात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. याबाबत तीव्र नाराजी होती. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते.

या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ कार्यालयात बैठक झाली. त्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाय सुचविण्याच्या सूचना करण्यात आल्या. यात या महामार्गावर अवजड वाहतुकीसाठी वेळ निश्चित केला जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तोपर्यंत ही वाहने नाशिक व भिवंडीच्या सीमेवर जागा घेऊन उभारलेल्या वाहनतळावर अवजड वागने थांबविण्यात येतील. या भागात शक्य असतील, तेथे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त केले जातील.

राष्ट्रीय महामार्ग, एमएमआरडीए, एमएसआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस यांची टास्क फोर्स करण्यात येईल. हा टास्क फोर्स रोजच्या रोज वाहतुकीचा आढावा घेऊन उपाय करेल. यापुढे या भागातील रस्ते करताना त्यावरील फलकावर केवळ कंत्राटदारांची नव्हे, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नावेही असतील, हे महत्त्वाचे निर्णय झाले.

या उपायांमुळे वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वेळी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, सचिव मनीषा म्हैसकर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सत्यजित तांबे, आमदार दौलत दरोडा यांसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT