rice crop unseasonal damage file photo esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: कापणी करून पडलेल्या 27 हेक्टर भाताचे नुकसान! पंचनामे सुरू; तहसीलदार देशमुख यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : काढणी करून शेतात पडलेल्या भात पिकाचे अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एकूण २७ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज असून, महसूल, कृषी विभाग व ग्रामसेवकांनी संयुक्तरीत्या पंचनामे सुरू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली. (Nashik Unseasonal Rain Damage to 27 hectares of paddy after harvesting Panchnama started Information of Tehsildar Deshmukh)

शहर व तालुक्यात तीन दिवसांत अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा.

एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यास पंचनाम्यापासून वंचित ठेवू नका. शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

तालुक्यात अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने पांढुर्ली परिसरात शेतमालाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतमालाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसीलदारांना केल्या.

या वर्षी तालुक्यात दुष्काळामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी जळली. त्यानंतरही शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर पिके घेतली. दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काही पिकांचे नुकसान झाले आहे.

रब्बी पिकांना फायदा

सिन्नर तालुक्यात फारशी गारपीट झालेली नाही. एक-दोन द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानीच्या तक्रारी आहेत. त्याची तत्काळ शहानिशा होईल.

काढणी केलेल्या भातपिकाचे आणि एक ते दोन हेक्टर कांदा पिकाचे नुकसान आहे. मात्र, हा अवकाळी पाऊस तालुक्यातील रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT