Sanjay Raut Esakal
नाशिक

Sanjay Raut | आमचे राजकारण संयम आणि समन्वयाचे : खासदार राऊत यांचा घणाघात

दिल्लीतल्या मंडळींकडून शिवसेना संपवण्याचे षडयंत्र

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : पन्नास वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मराठी माणसांसाठी लढत आली आहे. मात्र दिल्लीच्या गादीवर बसलेल्या मंडळींकडून शिवसेना संपवण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा घाणाघात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

आमचे राजकारण संयम आणि समन्वयाचे असून बाळासाहेब ठाकरे यांच्या याच शिकवणुकीचे अनुकरण करत आम्ही पुढे जाऊ आणि नव्या दमाने शिवसेना उभी करू याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Sanjay Raut attacking statement Our politics of moderation and coordination maharashtra politics shivsena bjp sharad pawar uddhav thackeray)

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथील श्री बुवाजी बाबा मंदिराच्या कमानीचे लोकार्पण खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथील श्री बुवाजी बाबा मंदिराच्या कमानीचे लोकार्पण खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, महंत बुवाजी बाबा पुणेकर, अहिलाजी पुणेकर , राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, बी.आर. चकोर, माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, संजय सानप, मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.

शांततेची मला सवय नाही. बुवाजी बाबाच्या मंदिरात प्रवेश केला तेव्हा हर हर महादेव ची गर्जना ऐकायला मिळाली. 350 वर्षांपूर्वी याच गर्जनेने दिल्लीतल्या सत्ताधीशांचा माज उतरवला होता. वर्तमान स्थितीत महाराष्ट्राचा आवाज असलेली हीच गर्जना दिल्लीत घुमली पाहिजे असे सांगत खासदार राऊत यांनी नाव न घेता मोदी-शहांना लक्ष्य केले.

दिल्लीतल्या सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर लादलेले संकट दूर करण्यासाठी पुन्हा एकदा भवानी तलवार हाती घ्यावी लागणार आहे. मराठी माणूसच दिल्लीच्या तख्ताला पुन्हा एकदा हादरा दिल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

निऱ्हाळे येथील बुवाजी बाबा मंदिराची महती महंत बबन महाराज सांगळे यांनी सांगितली. तेव्हाच कार्यक्रमाला यायचे निश्चित केले होते. महाराष्ट्र, पक्ष आणि माझ्यावर वारंवार संकटे येत आहेत. त्या संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा बुवाजी बाबाच्या दर्शनाने मिळाली असल्याचे सूतोवाच खासदार राऊत यांनी केले.

आम्हाला गुवाहाटी ला जायची गरज नाही, रेडे शोधायची गरज नाही, कोणाकडे हात दाखवून भविष्य बघायची गरज नाही. मनोभावे माथा टेकवून ऊर्जा देणारी बुवाजी बाबा सारखी देवस्थाने या महाराष्ट्रात आहेत.

मी पुन्हा येईल...

बुवाजी बाबाच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाले आहे. त्यामुळे मी पुन्हा या मंदिरात येईल. मी पुन्हा येईल असे तीन वेळा म्हणणार नाही. तुम्ही मात्र पुन्हा पुन्हा माझ्या आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा.

बुवाजी बाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबई आणि दिल्लीतल्या विरोधकांची लढत राहू. पुढच्या यात्रोत्सवाला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना घेऊन येईल. बुवाजी बाबाची कृपा झाली तर राज्याचे मंत्रिमंडळ घेऊन या ठिकाणी दर्शनाला येईल असे खासदार राऊत म्हणाले.

"या देवस्थानांमध्ये श्रद्धेचा कुठलाही बाजार मांडला जात नाही. पदस्पर्श करून दर्शन घेताना देवाच्या मूर्तीला लाखो लोकांचे हात लागलेले असतात त्यातून त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होते. त्यातून निर्माण होणारी अनामिक ऊर्जा संकट हरण करणारी असते. भव्य दिव्य मंदिरे उंच घुमट हाच खरा महाराष्ट्र आहे. राजकारणात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज तुमच्या हातात तलवार आहे कदाचित उद्या ती तलवार आमच्या हातात येईल. पाठीवर वार करू नका आणि समोरच्याने वार केला तर तो छातीवर घ्या हे शिकवण बाळासाहेब ठाकरे यांची आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपणार नाही. मी तुरुंगात जाताना हसत गेलो, बाहेर पडताना देखील तसाच हसत आलो. कोणत्याही संकटाला हसत हसत सामोरे जाण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या मातीने दिली आहे. उद्या माझे जे व्हायचे ते याच मातीत आणि मातीसाठी होईल."

- संजय राऊत

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

'ती' शरद पवार यांची राजकीय खेळी

पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला शरद पवार यांच्या बाबतीतला गौप्यस्फोट ही खुद्द शरद पवार यांचीच त्यावेळची राजकीय खेळी असावी असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.

तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे घेणे हे आव्हानात्मक होते. कदाचित महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे शिफारस करताना बहुमताची यादी दिली गेली असती तर राजकीय कल्लोळात राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण वर्षभर लांबवले असते.

त्यामुळेच राजकीय खेळीचा भाग म्हणून दस्तूर खुद्द शरद पवार यांनी फडणवीस यांची हात मिळवणी करून सरकार स्थापनेचा घाट घातला असेल तर त्याबाबत मी माझे मत देणार नाही. परंतु पहाटेच्या वेळी घेतलेल्या त्या शपथविधीमुळे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग सोपा झाला अशी टिप्पणी खासदार राऊत यांनी केली.

सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथे बुवाजी बाबा देवस्थानच्या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत यांनी हा खुलासा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT