Rain News
Rain News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain News : शिरपूर तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : ज्येष्ठा नक्षत्रावर तालुक्यात आगमन झालेल्या वादळी पावसाने रविवारी (ता. ४) दुपारी सर्वदूर धुमाकूळ घातला. झोपड्या, कच्च्या घरांचे पत्रे खेळण्यासारखे हवेत उडवून नेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झाडे तुटली असून, वीजपुरवठा ठप्प झाला.

अचानक आलेल्या वादळाचा सामना करताना लोकांची पुरेवाट झाली. या वादळाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Rain update Stormy rain in Shirpur taluka big loss Dhule News)

पाऊस आणि वादळाचे कोणतेही चिन्ह नसताना सकाळी साडेअकराला आभाळ दाटून आले. पाठोपाठ वादळाला सुरवात झाली. अचानक आलेल्या वादळामुळे नागरिक भांबावलेले असतानाच त्याचा जोर कमालीचा वाढला.

कुडाच्या झोपड्या, कच्च्या घरांवरील पत्रे वादळामुळे उडून गेले. रस्त्याकाठच्या झाडांच्या फांद्या मोठा आवाज करीत मोडून पडल्या. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खंडित झाली. काही ठिकाणी वीजतारा तुटून जमिनीवर पडल्या.

त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. संभाव्य हानीची शक्यता लक्षात घेऊन काही ठिकाणी वीज कंपनीने वीजपुरवठा बंद केला. तो उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. वीज नसल्याने मोबाईल टॉवर्सही पूर्ण क्षमतेने काम करत नव्हते. त्यामुळे संपर्क साधण्यासह इंटरनेटच्या वापरास मर्यादा आल्या.

केळीला फटका

तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात केळीची लागवड लक्षणीय प्रमाणात होते. विशेषत: पश्चिम भागात लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. वादळाचा जोर या भागात अधिक असल्यामुळे केळीच्या बागांचे सर्वाधिक नुकसान झाले.

जूनमध्ये लागवड झालेल्या नवतीचे आणखी एक-दोन पाड तयार होते. जुलै-ऑगस्टमधील पिलबाग कापणीच्या तयारीत होती, तर कांदेबागच्या निसवडीला सुरवात होणार होती. मात्र वादळामुळे उत्पादकांच्या सर्व नियोजनावर पाणी फेरले गेले.

वादळामुळे केळीची झाडे फण्यांसह मोडून पडली. या परिसरात फेब्रुवारीमध्ये लागवड झालेल्या पपईलाही मोठा फटका बसला आहे.

"वादळामुळे नुकसान झालेल्या केळीबागांची नुकसानभरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी या हंगामाचा विमा अद्याप उतरवलेला नाही. त्यामुळे त्यांना विमा सूत्रावर आधारित भरपाई मिळायला हवी."

-मंगलदास चौधरी, बभळाज

"केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषत: निसवडीला आलेल्या कांदेबागला सर्वाधिक फटका बसला आहे. तीच गत नवती व पिलबागची आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना होणे अपेक्षित आहे."

-विकास पाटील, हिसाळे

वाल्हवेत शाळेचे नुकसान

छडवेल कोर्डे : वाल्हवे (ता. साक्री) येथे रविवारी सकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

वादळामुळे वाल्हवे येथील साक्री तालुका ज्ञान विकास मंडळ संचलित शिवाजी माध्यमिक विद्यालय शाळेच्या सर्व वर्गखोल्यांचे पत्राचे छप्पर वादळी उखडून टाकले.

त्यामुळे शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तहसीलदार व तलाठी बासर सज्जा वाल्हवे यांनी आपल्या स्तरावरून लवकरात लवकर पंचनामा करून शासनापर्यंत पंचनाम्याचे अहवाल तत्काळ सादर करून शाळेची झालेली आर्थिक नुकसानाची भरपाई त्वरित मिळवून देण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापकांनी तहसीलदांकडे केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बभळाज येथे केळी पिकाचे नुकसान

बभळाज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

परिसरात सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा उद्‍ध्वस्त झाल्या आहेत.

हिसाळे येथील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या गट क्रमांक ६१ तोंदे शिवारातील दीड एकर क्षेत्रावरील केळीच्या बागेचेदेखील मोठे नुकसान झाले असून, काहींच्या छतावरील पत्रेदेखील उडाले, तर मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

काही ठिकाणी वीजतारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे केळी बागांचे अतोनात नुकसान झाले असून, केळी पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दोंडाईचात वाऱ्यामुळे झाडे उन्मळली

येथे सकाळी दहाच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारातील झाड उन्मळून पडले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास आकाशात ढग भरून आले होते.

दरम्यान, सोसाट्याच्या वारा व रिमझिम पावसाच्या सरीही कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली होती. शहरातील विविध दुकानांतील व्यवहार अर्धा तास खोळंबले होते.

पोलिस ठाण्यातील अंदाजे पाच वर्षांपूर्वीचे झाड उलमळून पडले. ठाणे अंमलदार यांच्या कार्यालयासमोरील जागा झाडाच्या फांद्यांमुळे व्यापली गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT