Crime News
Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मुलीसोबतच्या भांडणामुळे जावयास बेदम मारहाण; सासरा-मेहुण्यांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मुलीसोबत भांडण केल्याच्या कारणावरून जावयाचा बेदम मारहाण करून खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी सासरा व दोन मेहुण्यांना धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. एच. मोहम्मद यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २०२० मध्ये हा गुन्हा घडला होता.

यापूर्वी २०१९ मधील रेणुका धनगर खून खटल्यातही संशयिताला जन्मठेप झाली असून, सलग दुसऱ्यांदा दोषारोप सिद्ध करून आरोपींना दोषपात्र ठरविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. (Son in law brutally beaten to death due to dispute with daughter dhule crime news)

जुने भामपूर (ता. शिरपूर) येथील कविता विजय भिल हिने वडिलांना फोन करून पती तिच्यासोबत भांडण करीत असल्याचे सांगितले होते. त्यावरून संशयित १२ जुलै २०२० ला जावयाच्या घरी पोचले.

त्यांनी जावई विजय भिल याला ‘तू आमच्या मुलीस फाशी लावतो का, आता आम्हाला जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण तुला मारून टाकू,’ असे सांगून बेदम मारहाण केली. छातीवर मारहाण झाल्याने विजय भिल बेशुद्ध पडला. वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

विजयचा भाऊ अजय भिल याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ओंकार शंकर ठाकरे, अंबालाल ओंकार ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे (सर्व रा. जावदा, ता. शहादा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, हवालदार ललित पाटील, रवींद्र माळी, तुकाराम गवळी यांनी केला. प्रभारी अधिकारी ए. एस. आगरकर यांनी खटल्याच्या कामकाजावेळी जिल्हा सरकारी वकील गणेश पाटील, पैरवी अधिकारी हवालदार अजीज शेख यांच्या संपर्कात राहून पाठपुरावा केला.

उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. आर. एच. शेख यांनी संशयितांना खुनाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेप, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्याच्या परिस्थितीत तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे यांनी या कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT