नागपूर

आजीचा खून प्रकरण : फरार प्रेयसी, प्रियकराला अटक

अनिल कांबळे

नागपूर : राज्य राखिव पोलिस दलातून निवृत्त झालेल्या आजीचा गळा चिरून खून (Murder by slitting the throat) करणारी नात प्रियकरासह फरार झाली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी या दोघांनाही अमरावतीवरून अटक (Both arrested from Amravati) केली. या हत्याकांडात आतापर्यंत ६ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडीत (Police cell) ठेवण्याचे आदेश दिले. (Absconding sweetheart and boyfriend arrested 7 days police custody)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (६५, रा. सप्तकनगर) या एसआरपीएफमधून निवृत्त झाल्यानंतर एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मोठ्या मुलीची मुलगी रिया (बदललेले नाव) ही शालेय वयापासूनच वाईट संगतीला लागली. तिचे फैजान खान या युवकासोबत प्रेमसंबध आहेत. त्यामुळे ती सहा महिन्यांपासून फैजानच्याच घरी राहते.

तिच्या आई-वडिलांनी रियाची समजूत काढून घरी येण्यास सांगितले. ती आई-वडिलांना घरी येण्यास नकार देत होती. रियाला फैजानसह लग्न करून मुंबईत राहायला जायचे होते. त्यामुळे त्यांना पैसा हवा होता. त्यासाठी रिया आणि फैजानने आजीला लुटण्याची योजना आखली आणि इतर आरोपींना या खुनात सहभागी करून घेतले.

१४ मे रोजी रात्रीला त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. दागिने घेऊन ते पळून गेले. पळून जाताना त्यांनी घरात चोरी झाल्याचा देखावा निर्माण केला होता. पोलिसांनी विजयाबाईचा मोबाईल तपासला असता त्यात नातीचा क्रमांक मिळून आला. त्यावरून या खुनाचे रहस्य उघडकीस आले.

अमरावतीत काढला पळ

पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच रिया आणि फैजान यांनी दुसऱ्या दिवशी नागपुरातून पळ काढत अमरावती गाठले. त्यांनी तेथे मित्राच्या घरी आश्रय घेतला. नातीच्या मोबाईलचे लोकेशन घेत गुन्हे शाखा पोलिस अमरावतीला पोहोचले. पोलिसांनी झोपेतच रिया आणि फैजान ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी पोलिसांनी त्यांना नागपुरात आणले. पोलिसांनी त्यांना लुटीच्या मालाविषयी विचारणा केली असता लुटीचा माल अमरावती येथे मित्राच्या घरी ठेवल्याचे सांगितले. लुटीचा माल जप्त करण्यासाठी पोलिस पथक दोघांनाही घेऊन अमरावतीला जाणार असल्याची माहिती आहे.

सात दिवसांपर्यंत कोठडी

पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या नीलेश पौनीकर, बाबा उर्फ कादीर जाकीरखान, हरीश अंसारी, मो. कमरे आलम यांना पीआय दिनेश लबडे यांनी न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना अटक करायची आहे, दागिने हस्तगत करायचे आहेत, कट कसा आणि कशासाठी रचला याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकूण चौघांनाही सात दिवसांची कोठडी सुनावली.

कौर्याने गाठली सिमा

रियाने केवळ प्रियकरासाठी आजीच्या खुनाचा कट रचला. आजीकडे मुक्कामी असलेल्या रियाने मध्यरात्री प्रियकर फैजान आणि मित्रांसाठी दरवाजा उघडला. झोपेत असलेल्या आजीचे तोंड रियाने उशिने दाबले तर फैजानने आजीचा गळा कापला. बालपणात ज्या आजीने अंगाखांद्यावर रियाला खेळवले, त्याच नातीने एवढ्या क्रुरतेने आजीचा जीव घेतला. आजीचा रियासमोरच तडफडत जीव गेला.

(Absconding sweetheart and boyfriend arrested 7 days police custody)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT