आयटी रिटर्न भरण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राकडून विवरण पत्र सादर करण्याला मुदत वाढ देईल, अशी शक्‍यता आधीपासूनच वर्तवली जात होती. करदात्यांनी निर्धारित वेळेत विवरण पत्र सादर करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

मुंबई:  प्राप्तिकरदात्यांसाठी वार्षिक विवरण पत्र (रिटर्न) भरण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विवरण पत्रासाठी आज शेवटचा दिवस होता मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. प्राप्तिकरदात्यांना आता 5 ऑगस्टपर्यंत विवरणपत्र सादर करावे लागेल. www.incometaxefiling.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन विवरणपत्र सादर करता येईल. आता  2016-17 च्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राकडून विवरण पत्र सादर करण्याला मुदत वाढ देईल, अशी शक्‍यता आधीपासूनच वर्तवली जात होती. करदात्यांनी निर्धारित वेळेत विवरण पत्र सादर करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. अडीच लाखांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विवरणपत्र सादर करावे लागणार आहे.

पाच लाखांवर वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी ऑनलाईन रिटर्न फायलिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर सरकारने पॅनकार्ड आणि आधारकार्ड सलग्न केले असून याचा तपशिल रिटर्न फाईल करताना करदात्याला द्यावा लागणार आहे. कलम '80 सी" नुसार वर्षाकाठी दीड लाखांची कर सवलत मिळवता येणार आहे. करदात्यांच्या सुविधेसाठी सरकारने "आयकर सेतू" नावाचे मोबाईल ऍप सुरू केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Income tax return filing deadline extended to August 5, 2017