भारत-चीन सीमेवर मोठी घडामोड ते कोरेगाव-भीमा प्रकरणी धक्कादायक खुलासा; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

तृणमूलचे खासदार अधिर रंजन चौधरी यांना धारेवर धरले. सैफ आणि करिनानं मागील वर्षी प्रेग्नंसीचे प्लॅनिंग केले होते. ऑगस्टमध्ये त्या दोघांच्या वतीने ऑफिशियल एक स्टेटमेंट जाहिर करण्यात आले होते. 

पुण्यातील कोरेगाव-भीमा प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण लागलंय. या संदर्भात अमेरिकेतील एका सायबर एक्सपर्ट कंपनीने केलेल्या दाव्यानंतर मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे मोदी लोकसभेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यावेळी संतापल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे त्यांनी तृणमूलचे खासदार अधिर रंजन चौधरी यांना धारेवर धरले. सैफ आणि करिनानं मागील वर्षी प्रेग्नंसीचे प्लॅनिंग केले होते. ऑगस्टमध्ये त्या दोघांच्या वतीने ऑफिशियल एक स्टेटमेंट जाहिर करण्यात आले होते. सविस्तर बातम्या पुढे वाचा...

वॉशिंग्टन : पुण्यातील कोरेगाव-भीमा प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण लागलंय. या संदर्भात अमेरिकेतील एका सायबर एक्सपर्ट कंपनीने केलेल्या दाव्यानंतर मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  सविस्तर वाचा

बिजिंग : चीनने बुधवारी मोठी घोषणा केली आहे. भारत आणि चीनचे सैन्य पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यापासून माघार घेत आहे. या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे मोदी लोकसभेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सविस्तर वाचा

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजिवी हा शब्द आक्षेपार्ह आहे. भारताची निमिर्ती आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. यावेळी विरोधकांनी वारंवार खोडा घालण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : कोरोना विषाणू महामारीवर मात करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. भारताने दुसऱ्या देशांनाही लसीचा पुरवठा सुरु केला आहे. भारताने आतापर्यंत अनेक देशांना गिफ्ट म्हणून लस दिली आहे. सविस्तर वाचा

मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना वीज देयकात सवलत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ग्राहकांना थकीत रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.... सविस्तर वाचा

नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नेते सध्या दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील खासदारही या अधिवेशनात सहभागी झाले असून वेगवेगळ्या पक्षातील नेते एकमेकांच्या भेटीही घेत आहेत. सविस्तर वाचा

नागपूर : कोरोनामुळे नागपुरात अधिवेशन झालेच नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी होत होती. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तशी भावनाही व्यक्त केली होती. सविस्तर वाचा

सांगली : मराठी नाटक 'लाईव्ह' बघणाची रसिकांची इच्छा आजही कायम आहे. त्यांची नाटकाला हजेरी कमी-जास्त होते, मात्र नाटकांवरील प्रेम कायम आहे. रसिकांसाठी बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. त्यातूनही नव्या पिढीचा नाटकाकडे ओढा वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news india china bhima koregaon narendra modi farm law kareena kapoor