मराठा आरक्षणावर आज सुनावणी ते मिथुन चक्रवर्ती नक्षलवादी; ठळक बातम्या क्लिकवर

 breakfast
breakfast

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशे शाब्दिक हल्ले होताना दिसत आहेत. कोलकाताच्या ब्रिगेट परेड मैदानात अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तृणमूलने मिथुन चक्रवर्तींना नक्षलवादी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी ईडीला घाबरुन भाजपसोबत हात मिळवला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीस सोमवारपासून (ता.आठ) सुरुवात होत आहे. जयश्री पाटील (सदावर्ते) विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी कोर्ट नंबर सातमध्ये होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.


नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीस सोमवारपासून (ता.आठ) सुरुवात होत आहे. वाचा सविस्तर-

देश- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. खासकरुन महाराष्ट्र आणि  पंजाब या दोन राज्यांत कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. वाचा सविस्तर-

सप्तरंग- महिलांना हडळ (डायन) ठरवून त्यांना मरेपर्यंत अपमानाचे जीणे जगायला लावणारी दुष्ट प्रथा झारखंडमध्ये काही भागांत प्रचलित आहे. स्वत: या कुप्रथेच्या बळी ठरलेल्या छूटनी देवी यांनी निर्धाराने त्याविरोधात लढा देऊन शेकडो महिलांना अपमानास्पद जगण्यातून बाहेर काढले. वाचा सविस्तर-

कोलकाता- तृणमूलने मिथुन चक्रवर्तींना नक्षलवादी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी ईडीला घाबरुन भाजपसोबत हात मिळवला आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. वाचा सविस्तर-

सायटेक- ट्विटरला पर्याय असलेल्या भारतीय बनावटीच्या Koo या अॅपवरील युजर्सचा डाटा सुरक्षित नसल्याचा दावा एका फ्रेंच सुरक्षा संशोधकाने केला आहे. वाचा सविस्तर-

नवी दिल्ली- कोर्टाने म्हटलंय की, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांइतके गुण मिळवले असल्यास त्यांचा प्रवेश जनरल श्रेणीअंतर्गत दिला जावा, तर राखीव प्रवर्ग मागास वर्गातील त्या उमेदवारांसाठी असेल, ज्यांनी त्या कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक गुण मिळवले आहेत. वाचा सविस्तर-

Womens Day Special;  'पिंक' हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. म्हणजे तुम्ही तो एका डोळ्याने बघितला आहेच तर आपण दिग्दर्शकाच्या दुसऱ्या डोळ्याने तो बघायचा प्रयत्न करू म्हणजे वर काय म्हटले आहे हे तुमच्या लक्षात येईल. वाचा सविस्तर-

Women's day 2021 :आजचा दिवस तरी काही पुरुष मंडळी -विनोदाच्या आवरणाखाली का होईना- हसत हसत स्त्रियांचे कर्तृत्त्व मान्य करतील. वाचा सविस्तर-

 नवी दिल्ली- केंद्रात सत्तारूढ असलेला पक्ष संबंधित राज्यात किंवा राज्यांमध्ये निवडणूक लढवीत असेल तर अंशतः का होईना, त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दलच्या जनभावनेचे प्रतिबिंब निकालात पडू शकते. वाचा सविस्तर-

सातारा- भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com