मुंडे प्रकरणी भाजपचा आंदोलनाचा इशारा ते देशातील लसीकरण मोहिमेच्या अपडेट; वाचा एका क्लिकवर

टीम ईसकाळ
Saturday, 16 January 2021

राज्यातील तापमान पुढच्या काही दिवसांत कमी होणार असून थंडी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धनंजय मुंडे प्रकऱणी शरद पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. 

देशात कोरोना लसीच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली. लसीचे दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू देशात कायम असल्याचं समोर आलं आहे. तर राज्यात ठाकरे सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील तापमान पुढच्या काही दिवसांत कमी होणार असून थंडी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. धनंजय मुंडे प्रकऱणी शरद पवार यांनी नैतिकतेच्या आधारावर निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. 

1 लसीचे दुष्परिणाम झाले तर नुकसान भरपाई देणार - भारत बायोटेक देशात काही ठिकाणी स्वदेशी लस कोव्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत आता भारत बायोटेकने मोठी घोषणा केली आहे.  सविस्तर वाचा

2 कोविशील्डच द्या; स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांनीच दिला नकारदेशात कोरोना व्हायरसला रोखण्याच्या दिशेनं आज मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. सविस्तर वाचा 

3 देशात मोदींची हवा कायम, राज्यात ठाकरेंची कामगिरीही समाधानकारक; जाणून घ्या जनतेचा मूड 
कोरोना विषाणू आणि शेतकरी आंदोलनासारखे ज्वलंत मुद्दे असतानाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सविस्तर वाचा​

4 राज्यात थंडीचा कडाका वाढणार; काही दिवसांत तापमानात घट होणार 
राज्यात परत एकदा मध्यम थंडीची लाट येण्याची शक्‍यता असून, 20 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज. सविस्तर वाचा

5 स्टॉक ब्रोकिग कंपनीकडून गुंतवणूकदारांची 450 कोटींची फसवणूक; संचालकाला पोलिस कोठडी
चारशेहून अधिक गुंतवणूकदारांची 450 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्टॉक ब्रोकिंग कंपनीच्या संचालकाला अटक केली. सविस्तर वाचा

6 "मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही; वाराणसीत जाऊन लढण्याची ताकत माझ्यात आहे" 
दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. मात्र केंद्र सरकार शेतकऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सविस्तर वाचा

7 हीच खरी श्रीमंती! बिल गेट्स बनले जगातले सर्वात मोठे शेतकरी
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे चौथ्या स्थानी आहेत. सविस्तर वाचा

8 मुंडेंच्या प्रकरणात शरद पवार यांनी नैतिकतेने निर्णय घ्यावा - चंद्रकांत पाटीलधनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर राज्यात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने उचलून धरली आहे. सविस्तर वाचा

9 लसीकरणाच्या शुभारंभावर कंगनाची प्रतिक्रिया; शेअर केला खास व्हिडिओ कोरोना विषाणूच्या लसीचे दोन डोस दिले जात आहेत. दोन डोसमध्ये 21 दिवसांचे अंतर असणार आहे.  सविस्तर वाचा

10 CoWIN App - लसीकरणासाठी नोंदणीसह सर्वकाही; जाणून घ्या कसं वापरायचं 
पहिल्या टप्प्यात देशभरातील 3 कोटी आरोग्य कर्मचारी, पोलिस, जवान या फ्रंटलाईनवर कार्यरत असलेल्या लोकांना प्राधान्याने लस टोचण्यात येणार आहे. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news corona vaccination covishield covaxin dhananjay munde bjp bill gates pm modi