महाराष्ट्राची कोरोनावर मात ते चीनविषयी WHO ने केलेला खुलासा धक्कादायक; वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत आंदोलनजीवी शब्द वापरल्यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

महाराष्ट्रातून कोरोनाबाबत दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. राज्याने कोरोनावर यशस्वी मात केल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तर नांदेड इथं पंजाबमधील बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत आंदोलनजीवी शब्द वापरल्यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. अमेरिकेत व्हाइट हाउस सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडातील मार ए लागो इथं राहत आहेत. सध्या ते काय करतात याबाबत मेलानिया ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचं पथक कोरोना कुठून आला याचा शोध घेण्यासाठी गेलं होतं. त्यातून आता धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे. 

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग वाढीचा वेग आणि मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. महाराष्ट्राने केली कोरोनावर यशस्वी मात वाचा सविस्तर

बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधीच ट्र्म्प फ्लोरिडातील मार ए लागो इथल्या त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हापासून ट्र्म्प आणि त्यांचे कुटुंबिय तिथंच राहत आहेत. ट्रम्प सध्या काय करतात? मेलानिया यांनी दिली माहिती वाचा सविस्तर

WHOच्या संशोधकांच्या टीमने चीनमध्ये जाऊन, कोरोनाची पाळेमुळे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी चीन सरकारकडून तशा संशोधनासाठी अनुमती हवी होती. कोरोना आला कोठून? चीनविषयी WHOच्या खुलाशाने धक्का... वाचा सविस्तर

पंजाब येथील अमृतसरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका आरोपीला रविवारी (ता. आठ) नांदेड येथून अटक करण्यात आली. वाचा सविस्तर

पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल संसदीय कामकाज मंत्र्यांनी घेतली आहे. तृणमूल खासदार मोइत्रांवर कारवाईची शक्यता.. वाचा सविस्तर

अभिनेते व पर्यावरणवादी सयाजी शिंदे हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी करणार आहेत. महाराजांच्या पाच गडांवर ४०० हिरव्या मशाली लावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी बाबत केलेल्या विधानावर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.  वाचा सविस्तर

बहिणीला दूर ठेवल्याने कुटुंबात धुसफूस सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला या गेल्या काही महिन्यांपासून वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. भाऊ मुख्यमंत्री आणि बहिणीने स्थापन केला नवा पक्ष; सोशल मीडियावरून टीका वाचा सविस्तर

व्हायरस असलेलं अ‍ॅप गुगलने हटवलं; तुमच्याकडे असेल तर डिलिट करा, अ‍ॅपमध्ये व्हायरसची तक्रार मिळाल्यानंतर गुगलने त्वरीत हालचाली केल्या. अ‍ॅपला प्ले स्टोअरवरून एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं होतं. वाचा सविस्तर

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या आतापर्यत किती गर्लफ्रेंड झाल्या हे त्यालाही माहिती नसेल. आता त्याच्या एका जून्या गर्लफ्रेंडनं एक खुलासा केला आहे. 'सलमानशी लग्नं करणं माझं स्वप्न होतं, म्हणून...' वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news maharashtra corona china who trump punjab nanded narendra modi parliament