मराठा आरक्षणाप्रकरणी सुनावणी ते डोनाल्ड ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच, महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

टीम ईसकाळ
Wednesday, 20 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईहुडी जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेले लोक एक लग्न समारंभ पार पाडून घरी परतत होते. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं फेअरवेल स्पीच दिलं आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून या आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा कॅपिटॉल हिलमध्ये झालेल्या हिंसेचा उल्लेख केला.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती, मात्र या प्रकरणावरील सुनावणी आजच म्हणजे 20 जानेवारी रोजी लिस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये आज जो बायडन देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं फेअरवेल स्पीच दिलं आहे. सविस्तर वाचा

कोलकाता : कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईहुडी जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात रात्री वाहन अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफर्ड कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक लोकांना दुष्परिणाम जाणवले आहेत.  सविस्तर वाचा 

नवी दिल्ली : आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL technologies) पुढील सहा महिन्यांत जवळपास २० हजार जागांसाठी भरती करण्याच्या तयारीत आहे. डील साइनिंग आणि डिजिटल सेवांची मागणी वाढत असल्यामुळे कंपनीनं हे पाऊल उचललं आहे.  सविस्तर वाचा

पुणे : पुरंदर तालुक्‍यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सध्या असलेल्या जागेपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांडेश्‍वर, रिसे आणि पिसे जागेस एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. सविस्तर वाचा

मुंबई : मुंबईतील जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सीन लसीकरणाचे शहरातील एकमेव केंद्र आहे.  त्यात जे.जे. रुग्णालयात लसीकरणाला मंगळवारी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा

मुंबई : पोस्ट कोव्हिड अर्थात कोरोनोत्तर समस्यांपैकी हृदयविकार ही समस्या ठरत आहे. संसर्गानंतर ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात...  सविस्तर वाचा

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात पाय पसरने सुरू केल्याने खासदार प्रफुल पटेल यांना रोखण्यासाठी पटोले अस्र काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सविस्तर वाचा

कोल्हापूर  ः शहराची 2011 च्या जनगनणे नुसार लोकसंख्या 5 लाख 49 हजार 283 होती. लोकसंख्येची घनता 82.20 टक्के होती. तर महापालिकेचे क्षेत्र 6682 (हेक्‍टर) होते. गेल्या नऊ वर्षामध्ये स्वाभाविकपणे लोकसंख्या वाढली. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news Maratha Reservation supreme court donald trump farewell speech accident jalpaigudi purandar airport hcl