पूज चव्हाण प्रकरणात शिवसनेच्या मंत्र्यांचे नाव ते तामिळनाडूत आगीची मोठी दुर्घटना; वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने राज्यसभेत नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड केली आहे. तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंत्र्यांचे नाव घेण्यात आले आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसने राज्यसभेत नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड केली आहे. तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंत्र्यांचे थेट नाव घेत भाजपने आरोप केला आहे. वाचा सविस्तर 

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून आता राज्यसभेत काँग्रेसनं नवा विरोधी पक्षनेता निवडला आहे. वाचा सविस्तर

सरकारने ट्विटरला द्वेष पसरवणारे ट्रेंड चालवणाऱ्या अकाउंटवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता सोशल मीडियावरचा मोदी विरोध गुगलच्या सीईओंनाही भोवला वाचा सविस्तर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई विमानतळावर विमानातून उतरावं लागल्यामुळं त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. राज्यपालांच्या विमान प्रकरणावर अजित पवार बोलले  वाचा सविस्तर 

फेक न्यूज, द्वेष पसरवणारे आणि राजद्रोहाच्या पोस्टसाठी यंत्रणा बनवण्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने ट्विटर आणि केंद्र सरकारला  नोटीस जारी केली आहे. सोशल मीडिया युजर्संना द्यावी लागणार KYC? सुप्रीम कोर्टाची ट्विटर आणि केंद्र सरकारला नोटीस  वाचा सविस्तर

तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 12 जणांचा मृत्यू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, तामिळनाडूतील विरुधुनगरमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात लागलेली आगीची घटना दुर्दैवी आहे. वाचा सविस्तर

ममतांना पुन्हा धक्का; 'नुसतंच बसून घुसमट होतेय' म्हणत खासदाराचा राज्यसभेतच राजीनामा  वाचा सविस्तर 

प्रेम आहे पण पत्र लिहायचं कसं? कुठून सुरुवात करायची? नेमकं काय लिहायचं? असे एक ना अनेक प्रश्न असतील. तर तुमच्या भावना शब्दात मांडण्याचं आणि प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम सारद मजकूर करत आहे. वाचा सविस्तर

अभिनेता सलमानचा घोडा विकत देण्याच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. एका महिलेला तीन आरोपींनी १२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.  वाचा सविस्तर 

बेबोचे बेबी बंप फोटोशूट! दुसरे अपत्य गर्भात वाढत असल्यापासून ते प्रेग्नंट डेटपर्यंतची सर्व माहिती करिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news pooja chavan shivsena bjp sanjay rathod tamilnadu fire rajya sabha congress