
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं.
देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस टोचली जाणार आहे. मोदींनी देशात लसीरकण सुरु झाल्याचं सांगत कोविन अॅपचं उद्घाटन केलं. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोरोना लस टोचून घेतली. दरम्यान, कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरून जाऊ नये असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया असून यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतात.
Coronavirus Vaccination : सीरमच्या आदर पुनावला यांनी घेतली कोरोनाची लस टोचून
कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदीं यांच्या हस्ते लसीकरणाचा श्रीगणेशा झाला. - सविस्तर वाचा
दोन्ही कोराना लशी सुरक्षित, अफवांपासून सावध राहा; PM मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात कोरोना लसीकरणाच्या अभियानास सुरुवात केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी या महाअभियानाची सुरुवात केली. - सविस्तर वाचा
Corona Vaccination: लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका
देशात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात लसीकरण मोफत आहे. - सविस्तर वाचा
पुणे जिल्ह्यात पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला
पुणे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यू चा विषाणू सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे. दुपारपर्यंत तेथील पोल्ट्रीतील सुमारे तीनशेहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम युदिधपातळीवर सुरू केले जात आहे. - वाचा सविस्तर
कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय? कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या माहिती
लसीकरण सुरु झाल्यानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की, त्यांना लस कशी मिळणार? सरकारने यासाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं आहे. यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे. - सविस्तर वाचा
शिवसेनेच्या बड्या नेत्यावर किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, केली ED आणि RBI मार्फत चौकशीची मागणी
मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे- सविस्तर वाचा
अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल
प्रशांत भूषण यांनी अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचे कथित Whats App चॅट्स ट्विटरवरून प्रसिद्ध केले आहेत.- सविस्तर वाचा
मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार - नितीन गडकरी
केंद्र सरकारचा नवीन मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार आहेत. याच भंगारातून अल्युमिनियम व वेस्टपासून वेल्थ निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं गडकरींनी सांगितलं.- सविस्तर वाचा
भावा ! उगच हॉर्न कशाला वाजवतोस
विनाकारण हॉर्न वाजवण्याची सवय अनेकांना जडली आहे. पूर्ण रस्ता काही सेकंदात मोकळा व्हावा, यासाठी हॉर्नवर हॉर्न वाजवण्याचा सपाटा सुरूच असतो.- सविस्तर वाचा
विद्या बालनच्या 'नटखट'ला मिळाले ऑस्करसाठी नामांकन
बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नटखट विजेता शॉर्ट फिल्म ठरली. या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारसाठी नटखटला नामांकन मिळाले आहे.- सविस्तर वाचा
फक्त 2 रुपयांत मिळणार 1 GB डेटा, फ्री कॉलिंग आणि भरपूर फायदे असणारा खास प्लॅन
तुमच्याकडून डेटा जास्त वापरला जात असेल आणि तुम्ही चांगल्या प्लॅनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला अशा एक स्वस्त आणि मस्त प्लॅनबाबत सांगत आहोत. - सविस्तर वाचा