esakal | हुतात्मा एक्सप्रेस १ मार्च पासून ते मोटेरा स्टेडियमला मोदींचे नाव; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Aaj Divasbharat

देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे.

हुतात्मा एक्सप्रेस १ मार्च पासून ते मोटेरा स्टेडियमला मोदींचे नाव; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशातील इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशभरात खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

सोलापूर - तब्बल अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर - पुणे - सोलापूर हुतात्मा एक्‍स्प्रेस सोमवार 1 मार्चपासून धावणार - वाचा सविस्तर

मुंबई - ईडीच्या फेऱ्यात आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने ता 4 मार्चपर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी बुधवारी (ता.24) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. - वाचा सविस्तर

कोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. - वाचा सविस्तर

क्रिकेटपटू मनोज तिवारी याने आता राजकारणात आपली नवी इनिंग सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्याने बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोजने स्वतः आपल्या ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. - वाचा सविस्तर

नवी दिल्ली/पुणे - क्रिकेट आणि भारताचं अनोखं नातं आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या लोकांची संख्याही येथे मोठी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियमही याच देशात उभं राहिलं. - वाचा सविस्तर

मुंबई - रजनीकांत, बस्स नाम ही काफी है. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ भारतातच नाही तर जगात या अभिनेत्याचे चाहते आहेत. ते फक्त भारतीय नाहीत तर परदेशी देखील आहेत. - वाचा सविस्तर

मुंबई - एक प्यार का नगमा है, मोजी की रवानी है, जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है, हे गाणं आठवतयं. शोर या चित्रपटातील गाणे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी आपल्या स्वरांनी सजवले होते. - वाचा सविस्तर

विशाल समुद्र किंवा महासागराची एक वेगळीच भन्नाट दुनिया आहे. या दुनियेत अनेक आश्चर्यकारक गोष्टी आणि जीव पहायला मिळतात. अशीच एक विचित्र पण आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. - वाचा सविस्तर

क्रिकेटविश्‍वातील सर्वांत मोठ्या नव्या करकरीत मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil