esakal | ब्रेकफास्ट अपडेट्स: अर्णब गोस्वामी पुन्हा गोत्यात ते कोविन ऍपचा गोंधळ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast1

महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा

ब्रेकफास्ट अपडेट्स: अर्णब गोस्वामी पुन्हा गोत्यात ते कोविन ऍपचा गोंधळ; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, पण कोविन ऍपमुळे काही समस्या निर्माण होत असल्याचं दिसतंय. कोरोनाविरोधातील लढ्यात वैश्‍विक एकजूट दाखवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलंय.

विजेच्या तारेने केला घात, बसमधील 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
राजस्थानमध्ये जलोर इथं शनिवारी रात्री बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन बसला आग लागली.  सविस्तर बातमी-

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; व्हायरल चॅटनंतर Balakot ट्विटरवर ट्रेंड
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. सविस्तर बातमी-

कोविन ऍप ठरतंय अडचणीचं; तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला उशीर
देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या दिवसी किती जणांना कोरोनाची लस  (Corona Vaccination)  देण्यात आली, लशीचे काही दुष्परिणाम झाले किंवा अभियान राबवताना कोणत्या अडचणी आल्या का, याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. सविस्तर बातमी-

राशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)
मित्र हो, या सप्ताहात या विश्र्वाचं मानसिक पर्यावरण मंगळ-हर्षल योगातून प्रचंड बिघडत जाणार आहे आणि या मानसिक प्रदूषणाचे मानसिक संदर्भ इतके म्हणून खोल आणि गुंतागुंतीचे होत जाणार आहेत की माणूस आपला आपणच शत्रू कसा होत जातो हे गीतेत सांगितलेलं मृत्युलोकाच्या दुःखाचं अनंततत्त्वच जणू सिद्ध होणार आहे! सविस्तर बातमी-

कोरोनाविरोधात वैश्‍विक एकजूट दाखवा : गुटेरस 
कोरोनाव्हायरसच्या साथीत जगभरातील मृतांच्या संख्या २० लाखाच्यावर जाणे, ही बाब अत्यंत हृदयद्रावक आहे. या लाखो मृतांच्या स्मरणार्थ कोरोनाविरोधातील लढ्यात वैश्‍विक एकजूट दाखवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केले. सविस्तर बातमी-

राज्यात पुढच्या आठवड्यात चारच दिवस लसीकरण मोहीम; आरोग्य विभागाची माहिती
कोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16 जानेवारी 2021) सुरुवात झाली. दिवसभर लसीकरण मोहिम सुरळीत पार पडली. दरम्यान राज्यातील लसीकरण मोहिमेला 18 तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. सविस्तर बातमी-

स्वदेशी लस नको रे बाबा! कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड लसीची मागणी; अनेक डॉक्टरांचा नकार
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रतिक्षा शनिवारी संपली. सकाळी साडेदहा वाजता नागपूरात लसीकरणाला सुरूवात झाली. शहरात चार केंद्रांवर ऑक्सफोर्डची कोविशिल्ड आणि मेडिकलमध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. सविस्तर बातमी-

पुण्यात ४३८ जणांना कोरोनाची पहिली मात्रा; ५५ टक्के लाभार्थ्यांची उपस्थिती
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला शनिवारी (ता.१६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्भोधनानंतर प्रारंभ झाला. कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शहरातील आठ केंद्रांवर ८०० लाभार्थ्यांची निवड केली होती. सविस्तर बातमी-

कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे
आमदार सतीश चव्हाण यांनी सलग तीन वेळेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल शनिवारी (ता.१६) सुप्रिया सुळे यांच्याहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सविस्तर बातमी-

भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल विक्रमी वेळेत तयार; ले.कर्नल प्रसाद बनसोड यांची कामगिरी
अस्मी ही भारताची पहिलीवहिली स्वदेशी मशीनपिस्तुल (मशीनगन प्रमाणे गोळ्या झाडणारी) बनवण्याची कामगिरी नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांनी चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत केली आहे. सविस्तर बातमी-

Unmasking Happiness | राज्यातील 50 टक्के कोरोना मृत्यू सहव्याधींनी; 46.7 टक्के जणांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू 
राज्यात शनिवारपर्यंतचा कोव्हिडच्या मृतांचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे; मात्र यातील ५० टक्के मृत्यू कोव्हिडसह इतर सहव्याधी असणारे आहेत. सविस्तर बातमी-

loading image