esakal | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ते पेट्रोलची दरवाढ; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

latest news top news pooja chavan suicide petrol diesel pm modi mapping policy

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण ते पेट्रोलची दरवाढ; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिने आत्महत्या केली नाही तर हत्या झाली अशी चर्चा होत आहे. या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने देशाच्या मॅपिंग पॉलिसीत बदल करण्याची घोषणा केली आहे. तसंच आता भारत सरकार यापुढे सर्वात आधी कू अॅपवरून सर्व माहिती देण्याची शक्यता आहे. 

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रत्येक दिवशी नवी माहिती समोर येत आहे. आता पूजाची आत्महत्या की हत्या अशीही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, रूम भाड्याचा करार ते आत्महत्या या कालावधीत घडलेल्या घटनांमुळे हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर

सुशांतच्या बहिणींविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून सुनावणी; दिला महत्त्वाचा निकाल वाचा सविस्तर

केंद्र सरकारने देशाच्या मॅपिंग पॉलिसीमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. नव्या पॉलिसीमुळे भारतीय कंपन्यांना फायदा होईल असं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर

भारत सरकार यापुढे सर्व प्रकारची माहिती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याआधी कू अ‍ॅपवर शेअर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

उत्तराखंडमध्ये RSS ची मदत; फोटो शेअर केल्यानं परेश रावल ट्रोल, भाजप प्रवक्त्यांसह बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक दिसत असून पर्वतांवर भरलेली पोती घेऊन जाताना दिसत आहेत. वाचा सविस्तर

Toolkit Case: प्रजासत्ताक दिनाच्या आधी एक झूम बैठक झाली होती. यात धालीवाल याच्यासह अटक करण्यात आलेली क्लायमेंट ऍक्टिविस्ट दिशा रवी आणि निकिता जेकब यांचा समावेश होता. खलिस्तानी समर्थकांच्या संपर्कात असलेली निकीता जेकब आहे तरी कोण? वाचा सविस्तर 

प्रीमियम पेट्रोल 100 रुपयांच्यावर; गाडीसाठी फायद्याचं कोणतं? प्रीमियम पेट्रोलचे दर शंभरच्या वर गेल्यानं नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल यांच्यात काय वेगळं असतं? यामुळे फायदा काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. वाचा सविस्तर

पंकज त्रिपाठीचा 'हॅन्डपॅन' वाजवतानाचा एक व्हिडिओ सर्वाचं लक्ष वेधून घेतो आहे. ते वाद्य वाजवताना तो तल्लीन झाल्यानं त्या वाद्याचा वाद्यानंद त्यानं मनसोक्त घेतला आहे. वाचा सविस्तर

INDvsENG : 'बाप-माणूस' पुन्हा खवळला; कोहलीनं 'इज्जत'मध्ये पंचाशी घातली 'हुज्जत', दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा त्याचे 'पुराने तेवर' पाहायला मिळाले. वाचा सविस्तर

Ind vs Eng 2nd Test Day 3: चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडची अवस्था बिकट केलीय. 482 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. वाचा सविस्तर

loading image