दुपारच्या बातम्या: धनंजय मुंडे प्रकरणाचे अपडेट्स ते मायावतींची मोठी घोषणा; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

Traffic Jam: मुंबईपेक्षा पुणे बरे! जाणून घ्या जगातील स्थान
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. - सविस्तर वाचा

रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. - सविस्तर वाचा

तांडव झाला ट्रोल, हिंदू देवतांची केली बदनामी; पहिली 15 मिनिटे फारच वादग्रस्त 
भारतात प्रदर्शित होणा-या बहुतांशी मालिका आणि चित्रपट यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली नको त्या गोष्टी सादर करुन जनमाणसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे. - सविस्तर वाचा

पुणे महापालिकेचं अधिकृत ट्विटर अकाऊंट सस्पेंड
पुणे महानगरपालिकेचं ऑफिशियल ट्विटर अकाऊंट काल गुरुवारी सस्पेंड झालं आहे. मात्र, असं घडण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. - सविस्तर वाचा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं, कृषी सुधारणेचं पाऊल योग्य; पण...
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज 51 वा दिवस आहे. आज केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या दरम्यान चर्चेची 9 वी फेरी आहे. - सविस्तर वाचा

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंच्या मागे पुन्हा ईडी, आज होणार चौकशी
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. - सविस्तर वाचा

जपानमध्ये धर्मांतराची लाट? 10 वर्षांत मुस्लीम लोकसंख्येचा आकडा झाला दुप्पट!
जपान सध्या दुहेरी संकटाशी झुंजत आहे. एकीकडे जपानची लोकसंख्या घटत आहे आणि दुसरीकडे जन्मदरही कमी होत आहे. तसेच जपानमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा धर्मांतराचा विषयही चिंतेचा आहे. - सविस्तर वाचा

धनंजय मुंडे Genuine माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : रोहित पवार
'धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. - सविस्तर वाचा

पालघरमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या करुन भिंतीत लपवला मृतदेह
पालघरमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. - सविस्तर वाचा

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. - सविस्तर वाचा

Aus vs Ind 4th Test, Day 1 : धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियाने धावफलकावर लावल्या 5 बाद 274 धावा
मार्नस लाबुशेनचे शतक आणि मेथ्यू वेडनं त्याला दिलेली साथ याच्या जोरावर पहिल्या दिवशी खराब सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news top ten news maharashtra india dhananjay munde pune farmer protest cricket