esakal | सोलापूरच्या भाजप खासदारांचा पुन्हा जबाब ते भारतीय अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक मृतावस्थेत; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

breakfas update

राज्यासह देश, विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

सोलापूरच्या भाजप खासदारांचा पुन्हा जबाब ते भारतीय अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक मृतावस्थेत; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोलापूरचे भाजप खासदार यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएडडी गाईडसाठी असलेली अनुभवाची अट कमी केली जाण्याची शक्यता आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षख निकोलई स्नेसारेव हे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 

नागपूर - भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के नगरसेवकांची कामगिरी जेमतेम आढळून आली आहे. या सर्वेक्षणाचा आधार घेऊन आगामी निवडणुकीत तिकीट वाटप केल्यास तब्बल ८६ नगरसेवकांना घरी बसावे लागू शकते. वाचा सविस्तर

क्रीडा -  भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव हे पटियाला येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले आहेत. वाचा सविस्तर

आसाम - कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा आसाम दौरा यशस्वी ठरल्याने आसामच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी पुन्हा आसाम दौऱ्यावर यावे, अशी इच्छा आसाम कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडीसाठी गाइड म्हणून मान्यता मिळविण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाची अट आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमाचे उल्लंघन होत आहे. वाचा सविस्तर

आंतरराष्ट्रीय - संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाच्या (यूएनईपी) आणि त्यांची भागीदार संघटना रॅप (डब्ल्यूआरएपी) यांनी ‘वाया गेलेल्या अन्नाचा निर्देशांक २०२१’ हा अहवाल जाहीर केला आहे. जगात वर्षभरात 93 कोटी टन अन्न वाया; पाकिस्तानपेक्षा भारतात परिस्थिती वाईट वाचा सविस्तर
 

देश - ‘आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करू शकत नाही’, या ओळींसह जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्यांना स्थान मिळाले आहे. वाचा सविस्तर

सोलापूर - भाजपाचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने उमरगा तालुक्यातील डिग्गी व तलमोड येथील काही संशयितांची चौकशी केली. वाचा सविस्तर

मनोरंजन - Income Tax Raid : सात बँक लॉकर्स जप्त, ईमेल्सची तपासणी..  धाडसत्रातील १० महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी ही गरोदर असून तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच थाटामाटात पार पडला. योगिताने अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न केलं असून अक्षयने सोशल मीडियावर या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वाचा सविस्तर

ऑटोमोबाइल - वाहनांची समोरासमोर धडक झाली तर समोरच्या सीटवर बसलेला प्रवासी दगावला जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने आता मोटार वाहनांच्या समोरच्या सीटवर ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी  एअरबॅग अनिवार्य केले आहे. वाचा सविस्तर

क्रीडा - Road Safety World Series T20 : स्पर्धेत विरेंद्र सेहवागने दुसरे अर्धशतक झळकावले. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात 110 धावांचा पाठलाग करताना सचिन-सेहवाग जोडीने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. फक्त चौकार-षटकाराची डिल; सेहवागनं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक!  वाचा सविस्तर

 

loading image