श्रीनगर-लेह महामार्ग पुन्हा खुला

srinagar leh highway reopens
srinagar leh highway reopens

श्रीनगर- लडाख क्षेत्राला काश्मीर खोऱ्याशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे ऐतिहासिक मुघल रोड मात्र बर्फवृष्टीनंतर निसरडा झाला असल्यामुळे सोमवारी चौथ्या दिवशी बंद राहील.  

दरम्यान, काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा 300 किलोमीटर लांबीचा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गावर जड वाहने सतत एकाच बाजूला चालत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच, 434 किलोमीटरच्या श्रीनगर - लेह महामार्गावरील द्रासपासून ते सोनमर्ग या  ठिकाणांदरम्यान वाहतुकीसाठी आज सकाळी परवानगी देण्यात आली आहे, असे येथील वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हवामान अनुकूल असल्यामुळे दिवसभरात काश्मीरहून लेहला जाण्यास वाहनांना परवानगी दिली जाईल. 

बर्फवृष्टी आणि निसरड्या रस्त्यामुळे सोनमर्ग, जोजिला, मीनमार्ग आणि द्रास येथे 434 किमी लांब श्रीनगर-जम्मू महामार्गावर शुक्रवारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दीडशे गाड्या, रिकामे ट्रक आणि तेलाचे टँकर्स एवढीच वाहतुक शनिवारी द्रास  ते श्रीनगर सोडण्यात आली होती. हवामान अनुकुलतेमुळे दुसऱ्या दिवशी वाहतुकीत सुधारणा होऊन दोनशे गाड्यांना परवानगी देण्यात आली.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com