esakal | न्यूझीलंडमध्ये भारतीयांना No Entry ते PM मोदींनी घेतली दुसरी लस, ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

morming.jpg

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

न्यूझीलंडमध्ये भारतीयांना No Entry ते PM मोदींनी घेतली दुसरी लस, ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. देशात पुन्हा एकदा गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. देशात अनेक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडने भारतीय प्रवाशांना देशात प्रवेश नाकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा आज (दि.8) दुसरा डोस घेतला आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी मोठी घोषणा करताना भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. न्यूझीलंडने 28 एप्रिलपर्यंत सर्व प्रवाशांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण सापडत असताना न्यूझीलंडने हा निर्णय घेतला आहे.  वाचा सविस्तर


नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधात लढा सुरु असून व्यापक अशा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात मोदींनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला असून ट्विटवरून त्यांनी फोटोही शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी पहिला डोस एक मार्चला घेतला होता. वाचा सविस्तर


पुणे : देशात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झालेल्या महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारने आखडता हात घेतला. राज्याला मिळालेल्या एकेका लशीच्या डोसचे वितरण केले. त्यामुळे आता राज्याच्या लस साठवणूक केंद्रात लशीचा खडखडाट झाल्याचे चित्र बुधवारी दिसले. वाचा सविस्तर


दुबई -  येमेनच्या जवळ लाल समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या मालवाहतूक जहाजावर हल्ला झाल्याचा दावा विदेशी माध्यमांनी केला असून इराणच्या सरकारी वृत्त माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. या जहाजाचा वापर इराणच्या सैन्याचा तळ म्हणून केला जात असल्याचे समजते. वाचा सविस्तर

पुणे : कामाच्या ठिकाणी लसीकरण करण्यास परवानगी देण्यास केंद्र सरकारने बुधवारी अखेर मंजुरी दिली. या बाबतचे आदेश राज्य सरकारला आले आहेत. पुण्यातील २५ खासगी कंपन्यांनी त्यांच्या सुमारे १२ हजार कर्मचाऱयांचे लसीकरण कामाच्या ठिकाणी करण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मागितले आहे. शासकीय कंपन्यांसाठीही केंद्र सरकारने हा आदेश लागू केला आहे. वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील आर्थिक विषयासंबंधित विभागात (डीईए) युवा व्यावसायिक (यंग प्रोफेशनल) आणि सल्लागार (कन्सल्टंट) यांच्या एकूण 34 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

नाशिक : कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत बाजारपेठा बंद ठेवण्याच्‍या शासनाच्‍या निर्णयाविरोधात व्‍यापारी वर्गातून आवाज उठू लागला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बेरोजगारीचा प्रश्‍न आणखी गंभीर होण्याची स्‍थिती निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर


नागपूर : भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आपल्या भाषणात गटबाजी करू नका, असे आवाहन केल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी फोफावल्याचे स्पष्ट होते. स्थापना दिनाचे औचित्य साधून त्यांनी नेत्यांचे कान टोचले. त्यांचा इशारा नेमका कोणाकडे, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. वाचा सविस्तर


सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अलीकडेच ऍनुअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग (एआरपीआयटी) परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (ऍडमिट कार्ड) जारी केले आहे. उमेदवार एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. मात्र, 10 एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. वाचा सविस्तर


मुंबई : गेल्या आठवड्यात अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'रामसेतू' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मात्र शूटिंग झाल्यानंतर लगेचच अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. अक्षय कुमारनंतर 'रामसेतू'च्या टीममधील ४५ जणांनाही कोरोना झाल्याचं म्हटलं जात होत. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही बाब फेटाळली आहे.  वाचा सविस्तर

 

loading image